शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध, धनगर समाजबाधंव आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:29 IST

धनगर समाजावर गेल्या ६८ वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध, धनगर समाजबाधंव आक्रमकसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, विविध मागण्यांचे निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी : धनगर समाजावर गेल्या ६८ वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध केला.

येळकोट येळकोट - जय मल्हार, धनगड दाखवा नाही तर श्राद्ध घाला आदी गगनभेदी घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली. या मोर्चात गजानृत्य लक्षवेधी ठरले. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना सादर करण्यात आले.धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन देवूनच भाजप सरकार सत्तेवर आले. परंतु धनगर आरक्षणाला अद्यापही केंद्र सरकार कडून हिरवा कंदील मिळाला नाही. सरकारच्या याच नाकर्तेपणा विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव उपस्थित होते. यावेळी धनगर समाज एस.टी.आरक्षण कृती समितीचे मुख्य संघटक सुरेश झोरे, किशोर वरक, संतोष पटकारे, कान्हू शेळके, सुर्यकांत बोडके, संतोष साळसकर, बाबू हुंबे, विलास जंगले, दिपा ताटे, शितल भराडे यासह विद्यार्थी, महिला, असंख्य समाज बांधव उपस्थित होते.दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेला मोर्चा दीड वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गजा नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी सरकारवर जहरी टीका करून निषेध करण्यात आला. त्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.धनगर वेषभूषा वेधून घेत होते सर्वांचे लक्षधनगर समाजला अनुसूचित जमाती चे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मंगळवारी सकाळ पासून ओरोस रवळनाथ मंदिरात धनगर समाज बांधव गोळा होत होते. यात पुरूषां बरोबरच महिला व विद्यार्थी वर्गाची संख्या लक्षणीय होती. लहान मुले शालेय गणवेश परिधान करून आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरली होती. पौढ आपल्या पारंपरिक धनगर वेशभूषेत दिसत होते. लाल पांढºया रंगाचे झगे, पागोटे आदी पेहरावात समाज बांधव दिसत होते. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग