शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे, पोलीस अधीक्षकांकडून शासनाला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:31 IST

सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दिली आहे.

ठळक मुद्देआंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावेजिल्हा पोलीस अधीक्षकांकडून शासनाला प्रस्ताव सादर

सिंधुुदुर्ग : सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणानंतर आंबोलीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रात्र गस्तीवर पेट्रोलिंग कारही ठेवण्यात आली आहे. भविष्यात आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे व्हावे यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी दिली आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी पर्यटन दृष्ट्या प्रसिध्द असलेल्या आंबोलीचे नाव गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. पंजाबमधील ड्रग्स तस्करी करणाऱ्या युवकाने गळफास लावून घेतला होता. त्यानंतर सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या कोथळेचा मृतदेह पोलिसांनी आंबोलीत टाकला होता. गडहिंग्लज येथील शिक्षकाचा खून करून मृतदेह आंबोली- कावळेसाद येथे आणून टाकला होता. तर राधानगरी तालुक्यातील मुलगा व मुलगी यांनी याच ठिकाणी आत्महत्या केली होती.गृहराज्यमंत्री केसरकर यांनी आंबोलीला भेट देऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे होण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अधीक्षक कार्यालयाने शासनाकडे प्रस्तावही सादर केला असून, या ठिकाणी पर्यटन पोलीस ठाण्यासाठी मंजुरी दिली जाईल, अशी आशा आहे.

सध्या आंबोलीत मोठ्या प्रमाणात पोलीस दल उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याशिवाय आंबोलीत पेट्रोलिंगसाठी खास कारही देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीने पोलिसांना गस्त घालणे अवघड जात होते. आता कारमुळे गस्त घालणेही सोपे झाले आहे. आंबोलीत मे महिन्यात पर्यटक दाखल होणार असल्याने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPolice Stationपोलीस ठाणे