शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पॅडी संस्थेकडून इसदाचा गौरव, भारतातील एकमेव संस्था : विशेष पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:53 IST

आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हींगचे नियमन करणाऱ्या पॅडी या संस्थेच्यावतीने इसदा या संस्थेला मान्यता आहे, अशी माहिती सागर संशोधक व इसदाचे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.

ठळक मुद्देपॅडी संस्थेकडून इसदाचा गौरवभारतातील एकमेव संस्था विशेष पुरस्काराने सन्मान

सिंधुदुर्ग : आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हींगचे नियमन करणाऱ्या पॅडी या संस्थेच्यावतीने इसदा या संस्थेला मान्यता आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये स्कुबा डायव्हींग क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल म्हणजेच पर्यटकांना स्कुबा डायव्हींगचा अनुभव देणे, प्रशिक्षण देणे, स्थानिकांना प्रशिक्षण देणे, स्कुबा डायव्हींगच्या प्रशिक्षणाचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जाप्रमाणे ठेवणे, सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भरीव काम करणे यासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती सागर संशोधक व इसदाचे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.पॅडी संस्थांची वार्षिक महासभा गोवा येथील प्राईड हॉटेलमध्ये शुक्रवारी पार पडली. यावेळी संस्थेचे निर्देशक रॉब कॅमल हे उपस्थित होते. या महासभेला भारतातील सर्व स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षक उपस्थित होते. इसदातर्फे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासमवेत रुद्राक्ष आचरेकर, जितेश वस्त, नुपूर तारी, वसंत येरम, अंतोन फर्नांडिस, हर्षाली मांजरेकर, विवान राणे, विराज चोपडेकर आदी उपस्थित होते.भारतातून इसदा या एकमेव संस्थेचा सन्मानपूर्ण भारतामध्ये मालवण-तारकर्ली येथे इसदा ही सरकारतर्फे संचलित एकमेव संस्था आहे. भारतातून इसदा ही एकमेव संस्था पॅडीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेली आहे. भारतात सुमारे ५० संस्था स्कुबा डायव्हींगमध्ये कार्यरत आहेत.

यामध्ये अंदमान, लक्षद्विप, पाँडिचेरी, चेन्नई, गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये या संस्था आहेत. यातून इसदा संस्थेने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे इसदा ही संस्था सुरू होऊन फक्त तीन वर्षे झालेली आहेत. यातून अल्पावधीतच इसदाने भारतात स्कुबा डायव्हींग क्षेत्रामध्ये मोठा मान मिळविला आहे.

 

या यशाचे श्रेय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला जाते. यात व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सब व्यवस्थापकीय संचालक आशितोष राठोड, साहसी क्रीडा विभागाचे व्यवस्थापक रवी पवार, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी नेहमीच इसदाला सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. इसदाचे सर्व प्रशिक्षक व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज भारतात इसदाचा सन्मान झाला आहे. अशा प्रकारची संस्था सिंधुदुर्गात कार्यरत आहे, याचा मला अभिमान वाटतो.-सारंग कुलकर्णी,मुख्य प्रशिक्षक, इसदा 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन