शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भाविकांच्या उपस्थितीत कुणकेरी हुडोत्सव उत्साहात, पाथर उचलण्याचे खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:18 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे बुधवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

ठळक मुद्देभाविकांच्या उपस्थितीत कुणकेरी हुडोत्सव उत्साहातपारंपरिक पाथर उचलण्याचे खेळ

सिंधुदुर्ग : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे बुधवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

घोडेमोडणी, वाघाचा खेळ, पारंपरिक पाथर (धनगरणीचा दगड) उचलण्याचे खेळही पार पडले. कोकणातील शिमगोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध धार्मिकतेत मानाचा असतो. प्रथेप्रमाणे या हुडोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांनी गर्दी केली होती.यावेळी श्री भावई देवीचे तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढू लागले. यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारांवर दगड मारण्याची प्रथाही पार पडली. एकूण पाचवेळा दगड मारण्यात आले.हुडोत्सवादरम्यान तेथे पांरपरिक खेळही पार पडले. यात रोंबाटासह हुड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी, वाघाची शिकार आदींचा सहभाग होता. ज्यावेळी गावातील रोंबाट भावई देवीच्या मंदिराकडे आले, त्यावेळी हे खेळ खेळण्यात आले. हुडोत्सवात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठी गर्दी उसळली होती. यात महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHoli 2018होळी २०१८