शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग पोलीस भरती : शारीरिक चाचणीत ४२ उमेदवार अपात्र, १२७ जण बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:12 IST

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व  इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३ हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यात सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांपैकी १०२० उमेदवार हजर राहिले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. शारीरिक चाचणीत ४२ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत शारीरिक चाचणीत १२७ उमेदवार बाद झाले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग पोलीस भरतीत शारीरिक चाचणीत आणखी ४२ उमेदवार अपात्र दोन दिवसांत शारीरिक चाचणीत १२७ जण बाद

सिंधुदुर्गनगरी : येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व  इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३ हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते.

सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांपैकी १०२० उमेदवार हजर राहिले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. शारीरिक चाचणीत ४२ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत शारीरिक चाचणीत १२७ उमेदवार बाद झाले आहेत.जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून हजारो उमेदवार सिंधुदुर्गनगरी येथे दाखल झाले आहेत. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या राबविली जात आहे.

सोमवारी दिवसभरात २२२५ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ११३४ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर ८५ उमेदवार अपात्र ठरले होते. तर काही उमेदवार गैरहजर राहिले तर शेकडो उमेदवारांना प्रवेशपत्र न मिळाल्याने मोठ्या गैरसोईंना सामोरे जावे लागले.आज सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रत्येकी १५०० नुसार दिवसाला ३ हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी सकाळच्या सत्रात १५०० पैकी १०२० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहीले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. यात ९७८ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. दुपारच्या सत्रातील भरती प्रक्रिया सुरु असून त्याची आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही.गेल्या दोन दिवसांपासून भरती ठिकाणच्या प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचारी उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करून मैदानी चाचणीसाठी पुढे पाठवत आहेत. पुल अ‍ॅप्स, १०० व १६०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक हे मैदानी प्रकार घेतले जात आहेत.

सिंधुदुर्गनगरीत सुरू असणारी पोलीस भरती ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत शंभर टक्के पारदर्शकता येऊन इतर गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpolice parade groundपोलिस कवायत मैदान