शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:47 IST

चार मराठा कार्यकर्त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप न्यायालयात आरोपींच्यावतीने तक्रार

कणकवली : ओसरगांव ओवळीये तिठा प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या चार मराठा कार्यकर्त्यांना गेले सात दिवस पोलीस कोठडीत आंघोळीसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्याची पुरेशी व्यवस्था जाणिवपूर्वक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे़ याकडे कणकवली न्यायालयाचे लक्ष आम्ही तक्रार अर्जाद्वारे वेधले आहे, अशी माहिती संशयित आरोपीचे वकील अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी दिली.कणकवली येथील मराठा समाज संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाई परब, बाबू राऊळ, गांवकर, राजू राणे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते़यावेळी अ‍ॅड. हर्षद गावडे म्हणाले, बाळासाहेब सुर्यवंशी, आशितोष सावंत, रामचंद्र बोरगावे, तुकाराम लाड या चार मराठा कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे. ही बाब आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने संबधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

संशयित आरोपींच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्याचे काम पोलीस अधिकाºयांनी केले आहे. मराठा समाजाचे आंदोलक असल्यानेच पोलिसांनी संबधितांना नाहक त्रास दिलेला आहे. याबद्दल संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात मराठा समाजाच्यावतीने लवकरच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.तसेच मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, सात दिवस आंघोळ न केल्याने मराठा बांधवांचे स्वास्थ्य बिघडले आहे. पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे जर त्यांची प्रकृती खालावली तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असेही अ‍ॅड. गावडे यांनी यावेळी सांगितले.पाणी पुरवठा सहा महिने बंद!पोलीस कोठडीची इमारत उपकोषागार कार्यालयाच्या मालकीची आहे. मागील ६ महिन्यांपासून कोठडीच्या इमारतीत पाणीपुरवठा बंद आहे . त्यामुळे आम्हालाही अडचणी सहन कराव्या लागत आहेत. कोठडीतील आरोपींना नैसर्गिक विधीसाठी कस्टडी गार्ड पोलीस खांद्यावरून पाणी आणून देतात. याबाबत तहसीलदारांना कल्पना दिली आहे.

संशयित आरोपींना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, गार्डनी याबाबत कल्पना दिली नाही. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे ही तहसीलदार आणि बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्ग