शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:13 IST

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील उध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळ, फूल , भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार असून त्याठिकाणी संबधित व्यापारी तसेच विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे उपस्थित होते.समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक , झाडे अशा अनेक गोष्टी महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याबरोबर मुख्याधिकारी , नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली . आमचे म्हणणे आम्ही मांडले.त्यामध्ये कणकवली शहरातील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. नगरपंचायतीच्या मालकीचे विजेचे खांब काढून महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या ताब्यात दिले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा विजेचे खांब ते उभारून देणार आहेत.शहरात फ्लाय ओव्हर झाल्यावर सुमारे 500 मीटर अंतरावर एक अशी शहरात स्वच्छता गृहे बांधून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. पदपथांबरोबरच महामार्गाच्या दुतर्फा गटारे बांधली जाणार असल्याने शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.डी.पी. रोड जवळील आरक्षण विकसित झाल्यावर नगरपंचायत नियमाला अधीन राहून तेथील गाळ्यात व्यापारी, विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांचे पुनर्वसन नगरपंचायत करणार आहे. कोणतीही वशीले बाजी न करता सर्वाना समान न्याय दिला जाईल.इतरत्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरदार सूरू असताना आमदार नीतेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निदान एक वर्ष तरी कणकवलीतील व्यापाऱ्याना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो.महामार्गाच्या 45 मीटर अंतराच्या निसबाहेर 6 मीटर अंतर सोडून नवीन बांधकाम करायला परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड उभरण्याबाबत आमचे नियोजन सुरू आहे. तसेच व्यापारी , नगरसेवक , मुख्याधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन नवीन बांधकामा बाबत निर्णय घेण्यात येईल.शहरातील व्यापारी, हॉकर्स, भाजी विक्रेते यांची यादी बनविण्यात आली आहे. सद्य स्थितीत भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हर्णे आळी तसेच अन्य ठिकाणी जागा मालकांबरोबर बोलणी सुरु आहेत.भेळ तसेच इतर खाद्य पदार्थ विक्रेते यांना त्यांच्या गाड्या लावण्यासाठी जानवली नदिवरील गणपती साना येथील रस्त्याच्या दुतर्फा जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याठिकाणी खाऊ गल्ली उभारण्याचा आमचा विचार आहे. असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले....तर व्यापारी वाचले असते!कणकवली शहरातील व्यापारी तसेच झाडांचा पुळका काही सत्ताधाऱ्याना आता आला आहे. पूर्ण क्षमतेने यापूर्वीच त्यांनी प्रयत्न केले असते तर उध्वस्त होण्यापासून व्यापारी निश्चितच वाचले असते. झाडेही नष्ट झाली नसती. मात्र, महामार्गाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या सत्ताधाऱ्याना आता जाग आली आहे. अशी टिका समीर नलावडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग