शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:46 IST

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली बाजारपेठेत शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळे, फुले, भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे डी.पी. रोडजवळ आरक्षण विकासक विकसित करण्याचे काम सुरु करणार

सिंधुदुर्ग : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली बाजारपेठेत शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळे, फुले, भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार असून त्याठिकाणी संबधित व्यापारी तसेच विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे उपस्थित होते.समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक, झाडे अशा अनेक गोष्टी महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याबरोबर मुख्याधिकारी, नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली . आमचे म्हणणे आम्ही मांडले.त्यामध्ये कणकवली शहरातील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. नगरपंचायतीच्या मालकीचे विजेचे खांब काढून महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या ताब्यात दिले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा विजेचे खांब ते उभारून देणार आहेत.

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग