शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शिवसेनेकडून पालिकेचे नियम धाब्यावर, नगराध्यक्षांचेही छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:41 IST

सावंतवाडी नगरपालिकेने शहरात बॅनर लावण्यावर बंदी घातली असतानाच पालिकेचे नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसविल्याचे चित्र संपूर्ण सावंतवाडी शहरात आहे. सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्यानेच हे नियम धाब्यावर बसविले की काय, अशा चर्चेला ऊत आला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेकडून पालिकेचे नियम धाब्यावर, नगराध्यक्षांचेही छायाचित्रबंदी असूनही सावंतवाडीत बँनरबाजी

सावंतवाडी : नगरपालिकेने शहरात बॅनर लावण्यावर बंदी घातली असतानाच पालिकेचे नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसविल्याचे चित्र संपूर्ण सावंतवाडी शहरात आहे. सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्यानेच हे नियम धाब्यावर बसविले की काय, अशा चर्चेला ऊत आला आहे.

विशेष म्हणजे या बॅनरवर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचेही छायाचित्र आहे. तर शिवसेनेच्या पाठोपाठ स्वाभिमान पक्षानेही शहरात गणेशभक्तांच्या स्वागताची बॅनरबाजी केली आहे.नगरपालिकेने अलीकडेच गणेश उत्सवानिमित्त दक्षता समितीची बैठक घेतली. या बैठकीत सावंतवाडी शहर बॅनरने विद्रूप दिसत असल्याने शहरात बॅनर लावण्यात येऊ नयेत असा निर्णय पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घेतला. त्यांनी त्यासाठी एक नियमावली करण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी जावडेकर यांची ही घोषणा होऊन अवघे पंधरा दिवस उलटत नाहीत तोच पालिकेचा नियम सत्ताधारी शिवसेनेनेच धाब्यावर बसवला आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण सावंतवाडी शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी मोती तलावाच्या काठावर म्हणजेच नगरपालिकेसमोर तसेच एसटी स्थानकाच्या बाजूला कळसुलकर यांच्या भिंतीवर असे बॅनर लावले आहेत.

या बॅनरवर मंत्री दीपक केसरकर यांच्यापासून वरिष्ठ नेत्यांची तसेच नगराध्यक्षांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यांनी बंदी घातली त्यांचेच छायाचित्र बॅनरवर कसे तसेच तोच पक्ष नियम कशाप्रकारे धाब्यावर बसवतो, असा सवाल आता केला जात आहे.शहरात शिवसेनेने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र जिल्हा बँकेने तसेच इतर एक-दोन खासगी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेने आता कडक निर्बंध या सगळ्यांवर आणणे गरजेचे आहे. अन्यथा बोलाची कढी, बोलाचा भात असेच काहीसे शहरात होईल. त्यामुळे शहर स्वच्छतेत यातून मागे जाण्यास वेळ लागणार नाही. 

नगरपालिकेने सर्वांना आवाहन केले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेने बॅनर लावले ही वस्तुस्थिती आहे. याबाबत पुन्हा एकदा मी आवाहन करेन. शहर विद्रूप होत असून अशी कृती योग्य नाही. सर्व पक्ष जर बॅनर लावत नसतील तर शिवसेनेनेही बॅनर लावू नयेत या मताचा मी आहे.- बबन साळगावकर, सावंतवाडी नगराध्यक्ष

शहरात ठिकठिकाणी बॅनर राज्यसावंतवाडी शहरात शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र स्वाभिमाननेही बॅनरबाजी केली आहे. तसेच काही खासगी ठेकेदार यांनी आपल्या इमारतीची जाहिरात केली आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी ह्यबॅनर राज्यह्णच असल्याचे जाणवत आहे.सिंधुफोटो ०२सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग