शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवणात अस्वच्छतेला मिळणार पूर्णविराम : आप्पा लुडबे यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:34 IST

नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमालवणात अस्वच्छतेला मिळणार पूर्णविराम : आप्पा लुडबे यांचा विश्वासनऊ घंटा गाड्यांवर स्वच्छतेची भिस्त

सिंधुदुर्ग : नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.मालवण पालिकेतील सर्व नगरसेवकांनी याहीवर्षी स्पर्धेत सहभागी होण्याच एकमुखी निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्वाकांक्षी अभियानाचा चौथा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण २०१९ या नावाने येत्या २ आॅक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यात हागणदारी मुक्ती बरोबरच ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ करणे या तीन प्रमुख मुद्यांवर भर दिला जात आहे.आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन४० मजूर घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये दोन कामगार कार्यरत राहणार आहेत. उर्वरित सहा मजूर आडारी डंपिंग ग्राऊंड येथे वर्गीकरणाचे काम करणार आहेत. आडारी डंपिंग ग्राऊंड येथे गांडूळ खत व बायोगॅस प्रकल्पाचेही काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. कचरा कुंड्यांमध्ये प्रत्येक घराचा कचरा न जाता थेट घंटागाड्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही लुडबे यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग