शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शौचालयाचे अर्धवट बांधकाम, वेंगुर्लेतील कातकरी समाजवस्तीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:26 IST

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही.

ठळक मुद्देशौचालयाचे अर्धवट बांधकामवेंगुर्लेतील कातकरी समाजवस्तीतील प्रकार वेंगुर्ले नगरपरिषदेने जबाबदारी झटकली

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही.

ज्यांनी हे काम करून दिले, त्यांनी कातकऱ्यांना शौचालयासाठी खड्डा व शौचालयावरील छत तुमचे तुम्हीच करून ते वापरण्याचा सल्ला दिला होता. कातकऱ्यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेकडून व्यक्ती आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वेंगुर्ले नगरपरिषदेने त्या कामाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचार टॉवरनजीक गेली अनेक वर्षे वीस कातकरी कुटुंबे असलेली वसाहत आहे. या वसाहतीत पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच असते.या भागात सार्वजनिक विहीर नाही की नगरपरिषदेची बोअर विहीर, नळपाणी, अधिकृत घरे वा वस्ती नसल्याने नळपाणी योजनेची पाईपलाईन गेलेली नाही. त्यामुळे दाभोसवाडा येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते.कातकरी समाजाच्या या वस्तीत तीन महिन्यांपूर्वी कुणीतरी दोन शौचालये सीटपुरती बांधकाम करून दिली.त्यासाठी ड्रेनेजकरिता खड्डा सुध्दा मारलेला नाही व शौचालयास त्या सीटवर बसणाऱ्या व्यक्ती आडोसा राहील, अशा भिंतीही बांधलेल्या नाहीत. हा खड्डा व भिंती स्वत:च तुम्ही करावयाचा आहे, असे शौचालय बांधून देणाऱ्याने स्पष्ट केले.

ते नगरपरिषदेचे माणूस होते, असे कातकरी महिला सावित्री वसंत पवार हिने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या उघड्या शौचालयाचा फोटो व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याने वेंगुर्ले शहरात चर्चेला उधाण आले आहे. त्याअनुषंगाने स्वच्छता अभियानात क्रमांक पटकाविणाऱ्या नगरपरिषदेने देशस्तरीय स्पर्धेसाठी ते काम करून पैसे खाल्याचा आरोपही ऐकू येत आहे.मात्र, या कामाबाबत वेंगुर्ले नगरपरिषदेतील एकाही नगरसेवकाला त्याची माहिती नाही. प्रशासनाचे प्रमुख मुख्याधिकारी व बांधकाम निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता ते काम आम्ही केलेच नाही, त्यामुळे आमच्याकडून त्यावर खर्च करण्याचा प्रश्न येत नाही, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान