शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बिबट्याची दहशत; बैल, कुत्र्याचा फडशा, कर्लीतील घटना, भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:10 IST

मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत असलेल्या डरकाळीने संपूर्ण गाव सुन्न होत आहे.

ठळक मुद्देबिबट्याची दहशत; बैल, कुत्र्याचा फडशाकर्लीतील घटना, परिसरात भीतीचे वातावरण

मालवण : मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत असलेल्या डरकाळीने संपूर्ण गाव सुन्न होत आहे.मालवण सागरी महामार्गावर वसलेल्या परुळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कर्ली गाव येतो. चिपी विमानतळापासून जंगलमय भागात बिबट्यांची वसतिस्थाने आहेत. मात्र या बिबट्यांची दहशत कधी जाणवली नव्हती. मात्र महिनाभर एक मोठा बिबट्या अनेकांना दिसून येत आहे. गावातील अनेक कुत्रे या बिबट्याची शिकार बनली आहेत. दोन दिवसांपूर्वी गावातील श्यामसुंदर पिंगुळकर यांच्या छोट्या बैलाचा या बिबट्याने फडशा पाडला.याबाबत वन अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला मात्र बिबट्याला पकडण्याबाबत पिंजरा लावणे व इतर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अगदी लोकवस्ती पर्यंत हा बिबट्या येत असल्याने ग्रामस्थ, लहान मुले व वाहनचालक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वाहनचालक तर आपल्यासोबत संरक्षक वस्तू घेऊन प्रवास करत आहेत.

रात्री उशिरा तर या मार्गावरून दुचाकीस्वार आपला प्रवासही टाळत असल्याची माहिती ग्रामस्थ कालिदास चिपकर, दीपक दुधवडकर व प्रकाश करंगुटकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :Tigerवाघsindhudurgसिंधुदुर्ग