शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सिंधुदुर्ग : ...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंत, काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:45 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित रहावे, अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे, अशा इशारा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी बुधवारी येथे आयोजित बैठकीत दिला. आमदार नीतेश राणेही अशा कारवाईतून सुटणार नसून त्यांच्यावर राज्यस्तरावरून कारवाई होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंतकाँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारानीतेश राणेंना नोटीस येणार; इच्छुकांनी अर्ज सादर करा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित रहावे, अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे, अशा इशारा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. आमदार नीतेश राणेही अशा कारवाईतून सुटणार नसून त्यांच्यावर राज्यस्तरावरून कारवाई होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची पत्रकार परिषद येथील आरपीडी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील विस्तारात काँग्रेस कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, जिल्हा परिषदेवर आजही काँग्रेसची सत्ता आहे. काही पंचायत समितीही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र आज काही लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून दुसऱ्या पक्षाच्या बॅनरखाली वावरत आहेत. हे चुकीचे असून काँग्रेस पक्ष ज्या ज्या वेळेला अशा लोकप्रतिनिधींना पक्षाच्या बैठकांना बोलावेल, त्यावेळी त्यांनी बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. सावंतवाडी तालुक्यात उघडकीस आलेले ड्रग्ज पार्टी प्रकरण हे युवा पिढीसाठी धोकादायक आहे.

प्रशासनाने विशेषत: पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. आज ज्या पक्षाचे गृहराज्यमंत्री आहेत त्याच सत्ताधारी शिवसेना पक्षाचे लोक आंदोलनाची भाषा करतात हे हास्यास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्यात येणार असून यामध्ये कोणतीही व्यक्ती असल्यास त्याला पाठिशी घालण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका राहणार असल्याचे विकास सावंत म्हणाले.देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असून विरोधी पक्ष म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कुडाळ येथे सायंकाळी ४ वाजता ह्यसंविधान बचावह्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळीच उपस्थित राहणार आहेत. ओरोस जैतापकर कॉलनी येथे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी शिबिर होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.नीतेश राणेंना नोटीस येणार; इच्छुकांनी अर्ज सादर कराज्या कोणाकडून हा आदेश मोडला जाईल त्याला पक्षाच्या तरतुदीनुसार कायद्याने नोटीस बजाविण्यात येणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्याबाबतही हा नियम लागू असणार आहे. मात्र ते आमदार असल्याने त्यांना राज्यस्तरावरून याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.कणकवली नगरपंचायत निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत बोलणी सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीसाठी जे जे इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज संपूर्ण माहितीसह तालुका काँग्रेसकडे सादर करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेस