शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अवैध धंद्यांविरोधात काढला मोर्चा, मोंड येथील महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:00 IST

मोंड व मोंडपार गावातील अवैध दारूधंदे, मटका, जुगार बंदीबाबत तेथील महिलांनी देवगड पोलीस स्थानकावर मंगळवारी दुपारी धडक मोर्चा काढला. अवैध धंद्यांबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोंड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच विभा माणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याबाबत पोलीस व तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महिलांना दिले.

ठळक मुद्देअवैध धंद्यांविरोधात काढला मोर्चामोंड येथील महिला आक्रमकतहसीलदार, पोलिसांनी कारवाई करण्याचे दिले आश्वासन

देवगड : मोंड व मोंडपार गावातील अवैध दारूधंदे, मटका, जुगार बंदीबाबत तेथील महिलांनी देवगड पोलीस स्थानकावर मंगळवारी दुपारी धडक मोर्चा काढला. अवैध धंद्यांबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोंड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच विभा माणगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याबाबत पोलीस व तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महिलांना दिले.यावेळी मोंड ग्रामपंचायत सदस्या स्वाती कोळसुमकर, माजी सरपंच स्मिता अनभवणे, समाजसेविका प्राची तिर्लोटकर, अर्चना अनभवणे, वर्षा तांबे, अस्मिता अनभवणे, वासंती मुणगेकर, शामल अनभवणे, सुप्रिया अनभवणे, संध्या अनभवणे, मयुरी अनभवणे आदींसह सुमारे १५० ते २०० महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.मोंड गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव हे व्यसनमुक्त झालेच पाहिजे, गावातील दारूधंदे १०० टक्के आणि कायमस्वरुपी बंद झाले पाहिजेत, अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या. यावेळी माणगांवकर म्हणाल्या, मोंड व मोंडपार गावांमध्ये सुरू असलेल्या दारूधंद्यांबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून लहान शाळकरी मुलेदेखील या व्यसनाच्या आहारी जात आहेत.

अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. स्त्रियांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे गावातील दारूधंदे कायमस्वरुपी बंद झालेच पाहिजेत. गावातील दारूधंदे कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आम्ही मोर्चे काढतच राहणार आहोत. अवैध दारूधंद्यांबरोबरच मटका, जुगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषापायी गावातील लोक व तरुण आपली दिवसाची रोजीरोटी पणाला लावत आहेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी मोंड सरपंच प्रदीप कोयंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजाराम राणे, सामाजिक कार्यकर्ते अभय बापट आदी उपस्थित होते.वरिष्ठांनाही निवेदनयावेळी महिलांच्यावतीने देवगड तहसीलदार वनिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयालाही धडक देत दारूधंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी या वरिष्ठांनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे विभा माणगावकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWomenमहिला