शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

सिंधुदुर्ग : सॅटेलाईट मोजणीला ग्रामस्थांकडून विरोध, डिंगणे येथे खासगी कंपनीचा स्टील प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:12 PM

डिंगणे (ता. सावंतवाडी) गावात येथील होऊ घातलेल्या खाजगी कंपनीच्या स्टील प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. जमीन मोजणीची कोणतीही नोटीस न देता मंगळवारी सकाळी गावात करण्यात येणारी बेकायदा सॅटेलाईट मोजणी ग्रामस्थांनी बंद पाडली.

ठळक मुद्देसॅटेलाईट मोजणीला ग्रामस्थांकडून विरोधडिंगणे येथे खासगी कंपनीचा स्टील प्रकल्पकोणतीही नोटीस न देता मोजणी करत असल्याने नाराजी

सिंधुदुर्ग : डिंगणे (ता. सावंतवाडी) गावात येथील होऊ घातलेल्या खाजगी कंपनीच्या स्टील प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. जमीन मोजणीची कोणतीही नोटीस न देता मंगळवारी सकाळी गावात करण्यात येणारी बेकायदा सॅटेलाईट मोजणी ग्रामस्थांनी बंद पाडली.या कंपनीचे धातुरुत्तम पॉवर अँड इस्पात प्रा. लिमिटेड चे नाव आहे असून कंपनीचे जमीन खरेदी करण्यासंबधी चर्चा व समजूत काढण्यासाठी संध्याकाळी माऊली मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटची फसवेगिरी, स्थानिकांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे कंपनीच्या एजंटाकडून मिळाली नाही.

यावेळी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी कंपनी व ग्रामस्थ यांची संयुक्त मधस्थी केली. यावेळी एजंटवर फसवणुकीचा आरोप करत पोलिसांसमक्षच काही प्रमाणात धक्काबुक्की करण्यात आली. पोलिस निरिक्षक कळेकर यांच्या टिमने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.या कंपनीचा २००८-०९ साली स्टील प्रकल्प होऊ घातला होता. डिंगणे, मोरगाव गावातील सुमारे २०० एकरहून अधिक जमीन क्षेत्र संपादित केले होते. मात्र सामायिक क्षेत्र असल्याने कित्येकांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांची कंपनीविरोधात नाराजी होती. काही कालावधीनंतर कंपनीने गाडगीळ समितीच्या अहवालाचा आधार घेत प्रकल्पात बदल करून तेथे स्टील प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.यावेळी उपसरपंच जयेश सावंत, विलास सावंत, माजी सरपंच नाना सावंत, महादेव सावंत, जनार्दन सावंत, किमया सावंत, अनिता देसाई, फटू सावंत, शैलेश सावंत, दिनेश सावंत, सोमा सावंत, सुदर्शन सावंत, राजेश सावंत, प्रदीप सावंत, निलेश सावंत, भरत सावंत आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.भूकरमापकाला धरले धारेवरया प्रकल्पासाठी जादा जमीन क्षेत्राची आवश्यकता भासल्याने कंपनीने गोडकर नामक एजंटची नेमणूक केली. त्याने गावातील काहींना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित मूळ शेतकऱ्यांनी एकूणच प्रक्रियेबाबत फसवेगिरी लक्षात आल्याने प्रकल्पाला मोठा विरोध केला. भूमी अभिलेखच्या अनागोंदी कारभाराबाबत भूकरमापक रवींद्र चव्हाण यांनाही ग्रामस्थांनी प्रश्न विचारून धारेवर धरले. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग