शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवण येथे पर्यटन व्यवस्थापन शिक्षणाची संधी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:18 IST

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखामालवण येथे पर्यटन व्यवस्थापन शिक्षणाची संधी उपलब्ध होणार

नवी दिल्ली/सिंधुदुर्ग  : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे.या निर्णयाबाबत प्रभु यांनी  अल्फॉन्स यांचे पत्राद्वारे आभार मानले आहे. या पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्ग-मालवण भागात आयआयटीटीएमची शाखा सुरु झाल्याने स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कोकणपट्टयात पर्यटन व्यवसायास आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच या भागाच्या सर्वंक प्रगतीसाठीही ही संस्था महत्वपूर्ण ठरेल. कोकणाला 700 कि.मी.ची किनारपट्टी लाभली असून याठिकाणी पर्यटनाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण आहे.

रम्य निसर्ग व सागरी किना-यांमुळे कोकणात कायम देश- विदेशातील पर्यटकांची वर्दळ असते या संस्थेच्या स्थापनेमुळे या भागातील पर्यटन विकासाला गती येणार असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला आहे.सोयीच्या जागी संस्था उभारण्यात यावीरत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हयातील सोयीच्या जागी प्रस्तावित आयआयटीटीएमची शाखा उभारण्यात यावी तसेच या संस्थेमध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांची सुविधा असावी अशी विनंती प्रभु यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे केली आहे. संस्थेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गSuresh Prabhuसुरेश प्रभू