शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

सिंधुदुर्ग : कबड्डी स्पर्धेत ओम कल्याण ठाणे संघ विजेता, शाहू सडोली कोल्हापूर संघ उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:39 IST

कणकवली येथील कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम कल्याण ठाणे संघाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तर शाहू सडोली कोल्हापूर संघ या स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरसीच्या खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे अगदी पारणे फेडले.

ठळक मुद्देकबड्डी स्पर्धेत ओम कल्याण ठाणे संघ विजेताशाहू सडोली कोल्हापूर संघ उपविजेताकणकवली येथे कुणाल बागवे स्मृती चषक २०१८

कणकवली : येथील कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओम कल्याण ठाणे संघाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळविला आहे. तर शाहू सडोली कोल्हापूर संघ या स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. रविवारी रात्री उशिरा रंगलेल्या या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरसीच्या खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे अगदी पारणे फेडले.येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर प्रकाशझोतात सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कुणाल बागवे स्मृती चषक २०१८ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी प्रारंभ झालेल्या या निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेत सलग तीन दिवस क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार पहायला मिळाला.

कबड्डी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या शाहू सडोली कोल्हापूर संघालाही पारितोषिक देण्यात आले.

राज्यभरातील नामवंत कबड्डीपटूंनी या स्पर्धेच्या निमित्ताने कणकवलीत हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचा खेळ येथील क्रीडारसिकांना तसेच नवोदित कबड्डीपटूंना पहाता आला. कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भैरवनाथ नाचणी, कोल्हापूर हा संघ पराभूत झाला होता.

दुसऱ्या बाजूच्या उपांत्य फेरीतील सामन्यात एन.पी.एम. रायगड हा संघ पराभूत झाला होता. या पराभूत झालेल्या दोन्ही संघांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. दोन्ही संघांना प्रत्येकी रोख १० हजार रुपये व कुणाल चषक देऊन गौरविण्यात आले.

विजेत्या ओम कल्याण ठाणे संघाला प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ४१ हजार व कुणाल चषक तसेच उपविजेत्या शाहू सडोली कोल्हापूर संघाला रोख रुपये ३१ हजार व कुणाल चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ओम कल्याण ठाणे संघाचा शशांक हळदणकर हा ठरला. त्याला रोख ४ हजार व चषक देण्यात आला.

उत्कृष्ट पकडीसाठी शाहू सडोली, कोल्हापूर संघाच्या अक्षय पाटील याला रोख रुपये ३ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाईसाठी एन.पी.एम. रायगड संघाच्या स्मितील पाटील याला रोख रुपये ३ हजार व चषक देण्यात आला.

अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून ओम कल्याण ठाणे संघाच्या प्रशांत जाधव याला गौरविण्यात आले.अंतिम सामन्यातील विजेत्या संघातील खेळाडूंना सुवर्ण पदक तसेच उपविजेत्या संघातील खेळाडूंना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी भाजप नेते संदेश पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, राजश्री धुमाळे, परेश बागवे, दिलीप साटम, एम. बी.जाधव, महेश कुडाळकर, अमोल टकले, अमित मयेकर, हितेश मालंडकर, हरेश निखार्गे, निनाद दीपनाईक, शशांक बोर्डवेकर, सुभाष राणे, विशाल डामरी, गौरव हर्णे, महेश सावंत, महेंद्र मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैभव नाईक उपस्थितसलग १३ वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या या कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विद्यामंदिरच्या पटांगणावर हजेरी लावली. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळातर्फे संदेश पारकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडाsindhudurgसिंधुदुर्ग