शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

सिंधुदुर्गात तिन्ही राणेंच्या चक्रव्युहात अधिकारी अडकले!

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 12, 2025 18:05 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रशासनातील ३५ ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रशासनातील ३५ ते ४० वर्षांचा दांडगा अनुभव, पालकमंत्री नितेश राणे यांची काम करण्याची अफाट गती आणि आमदार नीलेश राणेंनी प्रशासकीय कारभाराचे पाँईट टू पाँईट केलेले विवेचन अशा तिन्ही राणेंच्या चक्रव्युहात जिल्ह्यातील अधिकारी पुन्हा एकदा अडकलेले आढळले.जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वच सत्ताधारी पक्षाचे असल्याने विरोधी पक्षाची भूमिका कोण बजावणार ? असे वाटत असताना आमदार नीलेश राणे यांनी दोन्ही भूमिका बजावल्याने जिल्ह्याचा कारभार हाकताना आपल्यावर आगामी काळात नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकाऱ्यांच्या कारभारात नक्कीच सुधारणा होईल, अशी आशा यानिमित्ताने वाटू लागली आहे.जिल्हा नियोजनातील अहवालात असणाऱ्या चुका, पारूप आराखड्यातील ठरावापासून सभेचे इतिवृत्त लिहिण्यापर्यंत असणाऱ्या चुकांवर बोट ठेवत आमदार नीलेश राणे यांनी सभेच्या सुरूवातीपासूनच तांत्रिक चुका दाखविताना आपण सत्ताधारी असलो तरी कारभारात कसलीच तडजोड खपवून घेणार नसल्याचे दाखवून दिले. तर गेली ४० वर्षे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनातील दांडगा अनुभव असणाऱ्या खासदार नारायण राणे यांनी समितीचे सचिव जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना वेगवेगळ्या पातळीवर सूचना करताना नियोजनचा निधी अखर्चित ठेवणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे सांगत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण केलेल्या कामाची चुणूक दाखवून दिली.  पालकमंत्री तथा जिल्हा नियोजनचे अध्यक्ष नितेश राणे यांनी पहिल्यापासूनच जिल्हा नियोजनचा यापुढील कारभार खूपच पारदर्शी असेल. १०० टक्के निधी डिसेंबरपर्यंतच खर्च होईल असे सांगताना आपण आर्थिक शिस्त लावण्यासाठीच काम करत आहे. निधी अखर्चित राहता कामा नये, यासाठी कडक भूमिका घेणार, हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.

ड्रग्सची घुसखोरी, अवैध व्यवसायांची कीडआमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील वाढती ड्रग्सची घुसखोरी, कर्नाटकातून येणारे बीफ यातून जिल्ह्याला अवैध व्यवसायांची कीड लागली आहे. यावर प्रकाशझोत टाकताना पोलिस यंत्रणेच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सभागृहात येवून आपली आणि पोलिस खात्याची भूमिका स्पष्ट करताना ड्रग्सविरोधी कारवाईत कुठलाही कर्मचारी आढळल्यास त्याची चौकशी लावली जाईल, असे आश्वस्त केले.

लोकमान्य टिळकांचा स्टॅच्यू, राणेंची संकल्पनासभेच्या शेवटी नारायण राणे यांनी पर्यटन विकासाबाबतच्या संकल्पना मांडताना किनारपट्टीच्या तालुक्याकडे आणि आंबोली हिलस्टेशनकडे जाणारा रस्ता सुसज्ज व्हावा, गुजराथमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूप्रमाणे लोकमान्य टिळक यांचा स्टॅच्यू किनारपट्टनजिक उभारावा आणि तिलारीमध्ये सुसज्ज उद्यान उभारावे अशा सूचना करत सभा गोडीगुलाबीने संपविली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे guardian ministerपालक मंत्रीNilesh Raneनिलेश राणे