शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला, सावंतवाडीतील समस्या : बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:45 IST

सावंतवाडी शहरात भटक्या जनावरांसोबत अलीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांबरोबर वाहन चालकांना ही मोठी समस्या बनून राहिली आहे.

ठळक मुद्दे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलासावंतवाडीतील समस्या : बंदोबस्त करण्याची मागणी

सिंधुदुर्ग : शहरात भटक्या जनावरांसोबत अलीकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांबरोबर वाहन चालकांना ही मोठी समस्या बनून राहिली आहे.सावंतवाडी शहरात प्रत्येक भागात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक वेळा पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र ठोस अशी कोणतीच कारवाई पालिका करु शकली नाही.

अलीकडे भटक्या जनावरांवर पालिकेने दंडात्मक कारवाई हाती घेतली. शिवाय ही कारवाई तशीच सुरु ठेवली आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात या भटक्या जनावरांपासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्यामुळे वाहनचालक, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, लहान मुले यांना भीती निर्माण झाली आहे.बरेचदा पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्र्रवही नागरिकांना सहन करावा लागत असून, या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासन घेणार का, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.भररस्त्यात असलेल्या कुत्र्यामुळे अनेकांना अपघाताचा सामनाही करावा लागला आहे. यामध्ये मोठ्या दुखापतीलाही सामोरे जावे लागले आहे. कुत्र्यांची उत्पत्ती रोखली गेल्यास हळूहळू ही समस्या सुटू शकते. मात्र नसबंदी प्रक्रिया हाती घेण्याचे धाडस पालिका प्रशासनाने घ्यावे. त्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांनी प्राशासनावर दबाव आणला पाहिजे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.कुडाळ नगरपंचायतीने अलीकडेच कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.

शहरात पालिका प्रशासन स्वच्छतेवर अधिक भर देत आहे. मात्र भटक्या कुत्र्यांकडून शहरात ठिकठिकाणी घाण करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांचे चावा घेण्याचेही प्रकारही वाढले आहेत. कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून याला वेळीच लगाम बसणे गरजेचे आहे.

तोडगा काढण्याचा प्रयत्नशहरात भटक्या कुत्र्यांचा वावर ही गंभीर समस्या पालिकेला भेडसावत आहे. यापूर्वी पालिकेने नसबंदीचा उपाय करुन पाहिला. मात्र, त्यातून म्हणावा तसा फायदा झाला नाही. नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.

टॅग्स :dogकुत्राsindhudurgसिंधुदुर्ग