शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

 सिंधुदुर्ग : एनआरएचएमचे आंदोलन सुरुच, मनसेच्या शिष्टमंडळाने दिली भेट, माजी खासदारांनी केली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 15:31 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनाला गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत चर्चा केली.

ठळक मुद्देएनआरएचएमचे आंदोलन सुरुच मनसेच्या शिष्टमंडळाने दिली भेट माजी खासदारांनी केली चर्चा

ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएम कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनाला गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देत चर्चा केली.एनआरएचएम कर्मचाऱ्यांना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे. सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे. त्यासाठी असलेली वयाची आत शिथिल करावी. कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम, समान वेतन कायदा लागू करावा. आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये. सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन आठव्या दिवशी सुरुच होते. या आंदोलनाला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली आणि चर्चा करीत स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा दिला. तसेच मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.मनसेच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासनआंदोलनकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, शिरीष सावंत, सत्यवान दळवी, मनीष चव्हाण उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल