शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : बक्षिसाच्या रकमेतून शाळेला रंगमंच, आंबेगाव शाळेचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:20 IST

भजन व फुगडीच्या माध्यमातून स्मार्ट डिजिटल झालेल्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव नं. १ ने यावर्षी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राप्त होणाऱ्या बक्षिसांचा उपयोग करून शाळेचा रंगमंच बांधण्याचे ध्येय शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी समोर ठेवले आहे.

ठळक मुद्देबक्षिसाच्या रकमेतून शाळेला रंगमंचआंबेगाव शाळेचा अभिनव उपक्रम

सावंतवाडी : भजन व फुगडीच्या माध्यमातून स्मार्ट डिजिटल झालेल्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव नं. १ ने यावर्षी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राप्त होणाऱ्या बक्षिसांचा उपयोग करून शाळेचा रंगमंच बांधण्याचे ध्येय शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी समोर ठेवले आहे.प्रशालेने दरवर्षी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर आर्थिक प्रगती साधत त्याचा उपयोग शाळेकरिता केला. दरवर्षी मुले एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यावर शाळेकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उपकारात्मक उपक्रमाव्दारे गुणवत्ता विकास साधणे अवघड होते. मात्र ही मुले शाळेकडे पाठ न फिरविता उन्हाळी सुटी सुरू होईपर्यंत यावीत, यासाठी शिक्षक व पालकवर्गाने १ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याचा सराव ११ एप्रिल पासून करण्यात आला.

यामध्ये रेकॉर्ड डान्स, नकला, गायन यांच्या सरावाबरोबर दशावतारही बसविण्यात आला. राजा दक्ष या दशावतारी नाटकाचा सराव करताना शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती राहिली. १ मे रोजी झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बक्षीसप्राप्त रकमेतून शाळेला ९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम गोळा करता आली.हा सगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मुणनकर, स्नेहा धोंड, मंजिरी मराठे, स्नेहल जगदाळे, संजय परब या शिक्षकांसह नाना सावंत, दीपक मेस्त्री, अनिल गावडे, संतोष जाधव, संतोष राणे, अशोक शिंदे आदी ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी केशव मुळीक, दिगंबर दळवी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या बक्षिसातून प्राप्त झालेली रक्कम शाळेच्या रंगमंच उभारणीकरिता खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग