शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

 सिंधुदुर्ग : यापुढे बदली नाही थेट निलंबनच करणार :  दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:50 IST

अवैध धंद्याशी संबंधित कर्मचारीच काय, दोषी असतील तर अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करतील त्याची बदली नाही, तर थेट निलंबन केले जाईल. असे कलेक्टर जिल्ह्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात असतील, तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना माहिती द्यावी. निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देअवैध धंद्यातील पैसे करणाऱ्यांची माहिती पोलीस अधीक्षकांना द्यापोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईचे समर्थन

सावंतवाडी : अवैध धंद्याशी संबंधित कर्मचारीच काय, दोषी असतील तर अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करतील त्याची बदली नाही, तर थेट निलंबन केले जाईल. असे कलेक्टर जिल्ह्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात असतील, तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना माहिती द्यावी. निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी केलेल्या बदल्यांचे समर्थनही केले आहे. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सभापती सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधवी वाडकर, अभय पंडित आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. तरीही यातून चुकून अवैध धंद्याशी संबंधित कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी राहिले असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश गृहखात्याने दिले आहेत.

कोणाची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखा आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्य जाते. ते सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात येत नाही. अन्य जिल्ह्यात पकडले जाते. अशा तक्रारी आल्या तर निश्चित त्यांची चौकशी केली जाईल. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जर कोण कलेक्टर असतील तर त्यांच्यावर अधीक्षकांनी कारवाई केलीच आहे.पण यातून कोण सुटले असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जनतेनेही आता पुढे येऊन अशा पोलिसांची माहिती अधीक्षकांना दिली पाहिजे, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले आहे. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली नाही तर थेट निलंबनच केल जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अवैध धंद्याशी संबंधित काही पोलिसांची यादी गृहखाते मागवत असून, त्यांच्यावर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असेही मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग