शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg- नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू, प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध; वातावरण तणावपूर्ण 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 31, 2023 12:18 IST

शेकडो ग्रामस्थ एकत्रित ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मारला

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : पोलिस बंदोबस्तात सुरू असलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे धरण प्रकल्पाच्या कामला ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा तीव्र विरोध केला. शेकडो ग्रामस्थ एकत्रित ठेकेदार कंपनीच्या कार्यालया बाहेर ठिय्या मारला. संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचे आव्हान पोलिस आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा असे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी सांगितले.यापूर्वी नरडवे प्रकल्पग्रस्तांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यात त्याच मागण्या या प्रकाश प्रकल्पग्रस्तांनी आजही मांडल्या. यात संकलन रजिस्टर अद्यावत करणे, पर्यायी शेतजमिनीसाठी ज्या खातेदारांनी ६५ टक्के रक्कम भरलेली आहे. तसेच पर्यायी जमिनीसाठी इच्छा प्रकट केलेली आहे. असे एकूण ३४७ खातेदारांची यादी असून यामध्ये काही खातेदारांना कुटुंबाची व्याख्या लावून काही खातेदारांमध्ये महिरपी कंस घालून ३४७ ऐवजी २९९ ची यादी बनविलेली आहे आणि ती ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे व ती आम्हा प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही. तरी ३४७ खातेदारांना स्वतंत्र जमिन अथवा विशेष आर्थिक पॅकेजचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. स्वेच्छा पुर्नवर्सन ज्या १५२ खातेदारांनी मागितलेली आहे. त्यांचे अनुदान केव्हापर्यंत मिळणार याची प्रकल्पग्रस्तांना हमी द्यावी. वाढीव २३४ कुटुंबाना शासन नियमांनुसार भूखंड अथवा अनुदान कधीपर्यंत मिळणार याची हमी द्यावी. पुर्नवसन गांवठणामध्ये काही कामांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पुर्नवसन गांवठणामध्ये नागरी सुविधांची कामे पूर्णपणे ठप्प आहेत. नरडवे प्रकल्पाचे काम मात्र जोरात चालू आहे. हे असे असा जाब यावेळी प्रकल्पग्रस्तांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीला विचारलेला आहे.दरम्यान, नरडवे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कदम आणि पोलिस निरीक्षक जाधव हे प्रकल्प ग्रस्थांसोबत चर्चा करत आहेत .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग