शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 20:25 IST

गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोणत्याही प्रकारचा दरोडा घातला नव्हता, त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची आहे.

ठळक मुद्देमच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष कारवाई चुकीची, राणे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

सिंधुदुर्गनगरी : मच्छिमारांना पोलिसांकडून त्रास होऊ नये यासाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांचे मच्छिमारांवरील अन्यायाबाबत लक्ष वेधले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली.गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोणत्याही प्रकारचा दरोडा घातला नव्हता, त्यामुळे पोलिसांची कारवाई चुकीची आहे.  यापुढे

मालवण समुद्रात गोव्यातील मच्छिमार बोटी अनधिकृतरित्या येऊन प्रकाशझोतातील मासेमारी करतात. यामुळे येथील मच्छिमारांचे मोठे नुकसान होते. या बोटी मालवण येथील मच्छिमारांनी ताब्यात घेत त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. यानंतर मालवणच्या या मच्छिमारांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरु केली आहे. हा विषय गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, सुरेश सावंत, संदीप कुडतरकर, एकनाथ नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.पालकमंत्र्यांना लगावला टोलापोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मालवणच्या मच्छिमारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि गोव्याहून सिंधुदुर्गमध्ये येऊन मासेमारी करणे हे चुकीचे आहे. आणि तेही प्रकाश झोतात.

बाहेरून येणारे मच्छिमार येथील मासे घेऊन जातात आणि येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे अशा बेकायदेशीररित्या मच्छिमारी करणाऱ्या बोटींविरोधात आंदोलन करत या बोटी पकडून पोलिसांकडे दिल्या. हा काही त्यांचा गुन्हा नाही! असे असतानाही या मच्छिमारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

ही चुकीची पद्धत आहे. खरे म्हणजे गस्तीनौकांच्या माध्यमातून अशा या नौका सरकारने पकडणे आवश्यक आहे. मात्र हे होताना दिसत नाही. असे सांगतानाच आपण पालकमंत्री असताना चार चार गस्तीनौका होत्या, असा टोलाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार