शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर बॉक्सवेलसाठी ठिय्या, तेर्सेबांबर्डे, मांडकुली ग्रामस्थ आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:17 IST

कुडाळ महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर बॉक्सवेलसाठी ठिय्यातेर्सेबांबर्डे, मांडकुली ग्रामस्थ आक्रमक  उपविभागीय अभियंत्यांच्या आश्वासनानंतर माघार

कुडाळ : महामार्गावर तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधावा, या मागणीसाठी तेर्सेबांबर्डे, मांडकुली व भोयाचे केरवडे येथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, १० मे पर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गाच्या पलीकडे शेतकऱ्यांची शेती, नदीवर पाण्यासाठी जाणाऱ्या गुरांचा मार्ग, स्मशानभूमी असल्यामुळे मांडकुली, भोयाचे केरवडे या दोन गावांना जोडणारा तेर्सेबांबडे-मळावाडी येथे बॉक्सवेल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या तिन्ही गावांच्या ग्रामपंचायतींमार्फत निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी प्रशासनाने यावर केवळ ग्रामस्थांच्यादृष्टीने समाधानकारक कार्यवाही करावी, असा शेरा मारून महामार्ग विभागाला पत्र देण्याचीच कार्यवाही केली. त्यामुळे तीनही गावातील संतप्त ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरत प्रस्तावित मागणीच्या ठिकाणीच लाक्षणिक ठिय्या आंदोलन छेडले.महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता शेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. महामार्ग चौपदरीकरण कामाचा आराखडा पूर्णत: तयार झाला असून त्यात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचा वाढीव खर्च व वाढणारा वेळ याचा प्रशासन स्तरावरून गांभीर्याने विचार केला जातो.

यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी एक समिती काम करते. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार करून आपण तसा प्रस्ताव आपल्या कार्यालयात तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवू. यासंदर्भात आपण काय कार्यवाही करणार आहात, याचे लेखी उत्तर तत्काळ बुधवारपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींना पाठविले जाईल. मात्र तोपर्यंत नियमानुसार व टेंडरनुसार काम करू द्या, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याशी महामार्ग प्रकल्पग्रस्तांची भेट निश्चित केली आहे. ग्रामस्थांनी आपले म्हणणे सादर करावे, असे सूचित केले. ग्रामस्थांनी या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी १० मे ची मुदत दिली आहे. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत, रुपेश कानडे, दिलीप निचम, अजय डिचोलकर, बाबुराव सावंत, गुणाजी जाधव, सागर कोरगावकर, सूर्यकांत कानडे, मधुकर दळवी, गुरूनाथ मराठे, केशव राणे, नयना कोरगावकर, भागिरथी कानडे, सुप्रिया कानडे, संजय डिचोलकर यांनी सहभाग घेतला. माजी उपसभापती बबन भोगटे, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, स्वाभिमानचे कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, दिनेश साळगावकर, सचिन धुरी, समीर हळदणकर यांनी यावेळी भेट दिली....तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिताआमच्या मागण्या प्रशासनाच्या कानी जात नसतील, तर झाराप येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल बडवत जावे लागेल, अशा भावना व्यक्त करतानाच यापुढे महामार्गावर अपघातात एकाचा जरी मृत्यू झाला, तर महामार्गावरच प्रतीकात्मक चिता रचून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग