शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : निशिगंधा कुबल ठरल्या महापैठणीच्या विजेत्या, आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्याना मानाची पैठणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:23 IST

शिवसेना नेते तथा होम मिनिस्टर फेम सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो महिला विद्यामंदिरच्या पटांगणावर उपस्थित होत्या.

ठळक मुद्देशिवसेनेच्यावतीने कणकवलीत कार्यक्रम द्वितीय देविका गुरव तर तृतीय परिणिता गुरवमहिलांची मोठी उपस्थिती

कणकवली : शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने खेळ मांडियेला... महापैठणीचा हा कार्यक्रम येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांची उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या या खेळात निशिगंधा कुबल महापैठणीच्या विजेत्या ठरल्या. तर कलमठ सरपंच देविका दीपक गुरव उपविजेत्या ठरल्या आहेत. तसेच परिणिता गुरव यांना तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी मिळविण्यात यश मिळाले आहे.शिवसेना नेते तथा होम मिनिस्टर फेम सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो महिला विद्यामंदिरच्या पटांगणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित स्पर्धकांमधून आदेश बांदेकर यांनी चिठ्ठीद्वारे स्पर्धकांची निवड केली. त्यानंतर आदेश बांदेकर यांच्यासोबत पैठणीचा खेळ खेळण्यात महिला दंग झाल्या होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच कोण ठरणार महापैठणीची मानकरी याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आणि ही उत्कंठता आणखीनच वाढली. दीपिका गुरव, परिणिता कोठावळे, निशिगंधा कुबल यांच्यात महापैठणीसाठी चुरस निर्माण झाली होती.मात्र, शेवटी या खेळात बाजी मारत निशिगंधा कुबल महापैठणीच्या विजेत्या ठरल्या. यावेळी प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच भाग्यवान विजेत्यांना चांदीच्या नाण्यासह अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, नंदिनी धुमाळे, स्नेहा तेंडोलकर, जान्हवी सावंत , शेखर राणे, प्रमोद मसुरकर, वैभवी पाटकर, संजीवनी पवार, आदी उपस्थित होते.आदेश बांदेकरांच्या किश्श्यांनी हास्याचे फवारेखेळादरम्यान आदेश बांदेकर यांनी विविध किस्से सांगत उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे फुलविले. त्यामुळे बुधवारची संध्याकाळ कणकवलीवासीय महिलांसाठी यादगार ठरली. या महापैठणीच्या खेळादरम्यान आदेश बांदेकर यांनी स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या महिलांसाठीही विविध खेळ घेतले. यावेळी सादर झालेल्या विविध गाण्यांवर महिलांनी नृत्याचा ठेका धरला.

तरुणींसह वृद्ध महिलांनी फुगडीसह आपले वैशिष्टयपूर्ण नृत्यकौशल्य दाखविले. चांदणं चांदण झाली रात, वाट माझी बघतोय रिक्षावाला, पहिल्या धारेच्या प्रेमाने साला आदी गाण्यांच्या बोलावर युवाईसह सत्तरीतील आजीही थिरकल्या. त्यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Adesh Bandekarआदेश बांदेकरsindhudurgसिंधुदुर्ग