शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  मालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:15 IST

अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.

ठळक मुद्देमालवणी बोलीला राजाश्रय मिळाला पाहिजे : गंगाराम गवाणकर कणकवलीतील साहित्य संमेलनात प्रतिपादन

सिंधुदुर्ग : अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गने सिंधुभूमी कला अकादमी सिंधुदुर्गच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठानमध्ये पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी संमेलनाध्यक्ष महेश केळुसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, विश्वास मेहेंदळे उपस्थित होते.संदेश पारकर यांनी मालवणी बोली भाषा महाराष्ट्राच्या नकाशावर आली पाहिजे. या भाषेत प्रेम व आपुलकी आहे. या भाषेमुळे गोडवा निर्माण होतो. या भाषेमुळे सिंधुदुर्गातील ज्वलंतपणा दिसला, असे त्यांनी सांगितले.गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी कार्यक्रमास आलेल्या व्यक्तींवर लिहिलेल्या चारोळ्या म्हणून दाखविल्या. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा. नामदेव गवळी, अजय कांडर, कवयित्री सुनंदा कांबळी, मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास खानोलकर यांनी केले.कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, मालवणी बोलीचे जतन करणे आवश्यक आहे. साहित्य व कला क्षेत्रात सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी एखादे प्रशिक्षण सुरू करता येईल का याचा विचारविनिमय आम्ही करू. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हेसुद्धा सिंधुदुर्गातीलच आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कला क्षेत्राबाबत प्रशिक्षण वर्ग सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रमोद जठार यांनी यावेळी मुंबईत असतानाचे आपले अनुभव सांगितले. मुंबईतून आल्यानंतर आपण मालवणीतच बोलत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मुंबईत जरी शिक्षण झाले असले तरी मालवणी भाषेवरचे प्रेम कमी झालेले नाही, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराliteratureसाहित्य