शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवणात ४३ किलो प्लास्टिकमिश्रित पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:56 IST

मालवण बाजारपेठेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांची तपासणी केली. यात मालवण व कोल्हापूर येथील दोन व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. शहरात प्लास्टिकविरोधी राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

ठळक मुद्दे मालवणात ४३ किलो प्लास्टिकमिश्रित पिशव्या जप्तमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची कारवाई दोन व्यापाऱ्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल

सिंधुदुर्ग : मालवण बाजारपेठेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांची तपासणी केली. यात मालवण व कोल्हापूर येथील दोन व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. शहरात प्लास्टिकविरोधी राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले होते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरीच्या उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी शहरातील बाजारपेठ येथे अचानक धडक मोहीम राबविली. प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गिरीश ठाकूर, जयसिंग गावित, रमेश कोकरे यांच्या पथकाने शहरातील सुमारे ३५ ते ४० दुकानांची तपासणी केली असता पाच व्यापाऱ्याकडे नॉन ओव्हनच्या प्लास्टिकमिश्रित पिशव्या सापडून आल्या. यात तीन व्यापाऱ्यांकडे किरकोळ माल सापडून आल्याने तो जप्त करत प्लास्टिक वापर केल्यास कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले.दहा हजारांचा दंडप्लास्टिक बंदी विरोधी पथकाने दोन व्यावसायिकाकडे ४३ किलोचे प्लास्टिकमिश्रित पिशव्या जप्त करत १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. विजय ट्रेडर्सकडून २१ किलो जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मनीष खुपचंद वाडी (कोल्हापूर) यांच्याकडून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्याच्याकडूनही ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.प्लास्टिक बंदीवर पालिकेत बैठकप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने अचानक दुकानांची तपासणी मोहीम राबविल्याने काही व्यापाऱ्यांनी मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला. तर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मोहिमेला व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. व्यापाऱ्यांना कोणत्या पिशव्या वापरावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलावणे आवश्यक आहे, अशी भूमिका नेरुरकर यांनी मांडली. पालिकेत लवकरच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाईल, असे मुख्याधिकारी रंजना गगे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsindhudurgसिंधुदुर्ग