शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कला वृध्दिंगत होण्यासाठी गुरुंवरील निष्ठा महत्वाची : धनश्री फड़के-नाखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:30 IST

कणकवलीतील गंधर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून गंधर्व शास्त्रीय संगीत सभा दर महिन्याला आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आशिये श्री दत्त क्षेत्र येथे धनश्री फड़के- नाखे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देकला वृध्दिंगत होण्यासाठी गुरुंवरील निष्ठा महत्वाची : धनश्री फड़के- नाखे यांचे मतआशिये येथे गंधर्व शस्त्रीय संगीत सभेचे आयोजन

कणकवली : आपल्या गुरुंकडून मिळालेल्या कलेचा सातत्याने रियाज करणे, गुरूवर निष्ठा ठेवणे आणि वेळोवेळी प्रायोगिकतेवर भर दिल्याने कलाकारांची कला वृध्दिंगत होते. गुणवंत कलाकार यामुळेच खऱ्या अर्थाने घडत असतो, असे मत शास्त्रीय संगीत गायिका धनश्री फडके- नाखे यांनी व्यक्त केले.कणकवलीतील गंधर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून गंधर्व शास्त्रीय संगीत सभा दर महिन्याला आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आशिये श्री दत्त क्षेत्र येथे धनश्री फड़के- नाखे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमा दरम्यान कलाकार व्यक्तिगत आयुष्यात त्यांची कला कशी जोपासतो? त्याचे कलाविषयक विचार समजून घेण्यासाठी प्रसाद घाणेकर यांनी धनश्री फड़के- नाखे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.धनश्री फड़के- नाखे यांनी आपल्या एकंदर गायन कला कारकिर्दीचा प्रवास यावेळी संगीत रसिकांसमोर उलगड़ला. जयपूर अत्रौली घराण्याच्या विदुषी पद्मा तळवलकर यांच्या शिष्य असलेल्या धनश्री या संगीत विशारद आहेत . त्यांनी गायन या विषयातून एम .ए. हि पदवी संपादन केली आहे.त्यांना अनेक पारितोषिके , शिष्यवृत्ती व पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत . महाराष्ट्रातील अनेक शहरात त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.त्यानंतर धनश्री फड़के यांचे गायन झाले. ऐन गणेशोत्सवात रंगलेल्या या मैफिलीला दर्दी संगीत रसिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. या गंधर्व संगीत सभेच्या सुरुवातीला धनश्री फडके यांनी 'भीमपलास ' या रागातील बडा ख्याल व छोटा ख्याल गायला .त्यानंतर त्यांनी 'केदार ' रागातील दोन बंदिशी सादर केल्या .

केदार रागानंतर त्यांनी 'कलावती' रागातील बंदिश गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. यानंतर 'भाटियार ' रागातील 'पांडुरंग नामी' हा अभंग, 'हंसध्वनी' रागातील एक अभंग व शेवटी 'जोहर मायबाप जोहर' या नाट्यपदाने या सांगितिक कार्यक्रमाची सांगता केली . धनश्री फड़के यांना हार्मोनियम साथ मधुकर लेले व तबला साथ हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील कलाकारांनी केली .या गंधर्व मासिक सभेसाठी आसमंत रत्नागिरी या संस्थेचे नंदू पटवर्धन यांनी विशेष सहकार्य केले होते . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष सुतार ,किशोर सोगम, मनोज मेस्त्री, श्याम सावंत,सागर महाडिक, विलास खानोलकर, अभय खडपकर , दामोदर खानोलकर,दिनेश गोगटे,सुरजित ढवण यांनी विशेष मेहनत घेतली.21 ऑक्टोबर रोजी पुढील संगीत सभा !यापुढील २२वी गंधर्व शास्त्रीय संगीत सभा २१ ऑक्टोबर रोजी आशिये येथे होणार आहे. डोंबिवली येथील समीर अभ्यंकर यावेळी सुमधुर गायन सादर करणार आहेत . या मैफिलीला उपस्थित राहून शास्त्रोक्त संगीताचा आस्वाद रसिकानी घ्यावा असे आवाहन गंधर्व फाउंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले. आशिये येथे गंधर्व संगीत सभेत धनश्री फड़के- नाखे यांनी सुमधुर गीते सादर केली.

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग