शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सिंधुदुर्ग : सहकारातून मोदींचे स्वप्न साकार करुया : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:56 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्ड अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कोकणात यशस्वी करुया. कोकणचे हे मॉडेल देशभरात राबवून प्रत्येक शेतकरी उन्नत झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद सहकाराच्या माध्यमातून उभी करुया, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बँकेत बोलताना केले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : सहकारातून मोदींचे स्वप्न साकार करुया : सुभाष देशमुखनैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प योजनेचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्ड अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कोकणात यशस्वी करुया. कोकणचे हे मॉडेल देशभरात राबवून प्रत्येक शेतकरी उन्नत झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद सहकाराच्या माध्यमातून उभी करुया, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बँकेत बोलताना केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प योजनेचा शुभारंभ सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक अजय थुटे, राज्य बँक प्रादेशिक कोल्हापूरचे व्यवस्थापक अक्षय नगरनाईक, नाबार्डच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, सहकार सहनिबंधक मेधा वाके, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर्व संचालक, कर्मचारी, शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.प्रारंभी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा शाल, श्रीफळ व गणेशमूर्ती देऊन बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले. यावेळी कुक्कुटपालनासाठी महादेव पालव, दुधाळ जनावरे यासाठी भाऊ पालव, अंकुश माजगावकर, बायोगॅससाठी संतोष झारापकर व गणपत सावंत आदींना योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले.यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की, भगिरथ प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला यापूर्वी मी भेट दिली होती. भगिरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५ कोटींच्या सहकार्यातून नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भविष्यात हा प्रकल्प १०० कोटींपर्यंत करण्याचा यशस्वी प्रयत्न होईल.महाराष्ट्रातील सहकार समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्याला शंभर बायोगॅस असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका गावाला १०० बायोगॅसचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातून सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्यासाठी सहकाराची मदत घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकल्प सहकाराच्या माध्यमातून कोकण विकासासाठी राबविण्याचा मानस आहे.कोकणातील सहकारी बँका आणि नाबार्ड यांच्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन हे कोकणाचे मॉडेल तयार करण्यात येत आहे. हे कोकणचे मॉडेल यशस्वी करून हे मॉडेल देशात उभे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरिबातील गरीब उन्नत झाला पाहिजे, हे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी सहकाराच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करुया, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखsindhudurgसिंधुदुर्ग