शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बिबट्याची केली जाळून हत्या, दोडामार्ग तालुक्यातील घटना : पंजे छाटून नखांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:39 IST

दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना उगाडे येथील परिसरात फासळीत अडकलेल्या बिबट्याची जाळून हत्या करण्याची गंभीर घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. वनविभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वनविभागाचे कर्मचारी उगाडे येथे तत्काळ रवाना झाले आहेत. या बिबट्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची देखील तस्करी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देपंजे छाटून नखांची तस्करीबिबट्याची केली जाळून हत्यादोडामार्ग तालुक्यातील घटना

दोडामार्ग : तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना उगाडे येथील परिसरात फासळीत अडकलेल्या बिबट्याची जाळून हत्या करण्याची गंभीर घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

वनविभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वनविभागाचे कर्मचारी उगाडे येथे तत्काळ रवाना झाले आहेत. या बिबट्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची देखील तस्करी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सांबर, रानडुक्कर, गवे आदींच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. तिलारी जंगल परिसर व उगाडे परिसरात अशा घटना उघडकीस आल्या आहेत.

त्यामुळे शिकाऱ्यांना गजाआड करण्यासाठी वनविभाग वेगवेगळया उपाययोजना राबवित असला तरी शिकारीचे प्रमाण मात्र काही कमी झाले नाही. असाच एक प्रकार उगाडे येथील जंगल परिसरात घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनविभागाची झोप उडाली आहे.उगाडे परिसरात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या फासळीत आठ दिवसांपूर्वी बिबट्या अडकला.या बिबट्याला जाळून त्याची हत्या करण्यात आली. तसेच त्याचे पंजे छाटून त्याच्या नखांची तस्करी देखील करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.याबाबतची माहिती वनविभागाला समजल्याने वनपाल चंद्रकांत खडपकर व वनरक्षक संजय नीळकंठ हे घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.वनविभागावर शिकारी शिरजोरवनविभाग एकीकडे शिकारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शिकारीचे प्रमाण मात्र वाढतच आहे. उगाडे येथील प्रकारावरून हे पुढे आले आहे. त्यामुळे वनविभागावर शिकारी शिरजोर झाले असून त्यामुळे वनविभागाची झोप मात्र चांगलीच उडाली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ