शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : सिंधुदुर्ग : लाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:06 IST

देवगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनाने भक्तगण सुखावून गेला आहे.

ठळक मुद्देलाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला, देवगड तालुक्यामध्ये भक्तीमय वातावरण

सिंधुदुर्ग : तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनाने भक्तगण सुखावून गेला आहे. अगरबत्तींचा सुहास, मृदंग टाळांचा खणखणाट व भजनी गीतांच्या वातावरणात देवगड तालुक्यातील ग्रामीण भाग गजबजून गेला आहे. तालुक्यात गुरुवारी लाडक्या गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.देवगड तालुक्यातील मुंबई, वाशी येथील चाकरमानी हजारोेंच्या संख्येने गणेश उत्सवासाठी रेल्वे, खासगी गाड्या व एसटीने गावी आले आहेत. गणेशोत्सवाला गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्र्ण, जल्लोषपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. काही ठिकाणी गणेशमूर्ती गुरुवारी सकाळपासून घरी वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत नेण्यात आल्या.ठिकठिकाणी गणेशोत्सवाची सुरूवातही पहाटेपासूनच लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या गीतानेच करण्यात आली. देवगडमधील बाजारपेठ ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजबजली. देवगडमध्ये मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे बाजारपेठेत उत्सवाच्या आधीच दोन दिवस गर्दी उसळली होती. विविध डिझाईनची कापडी मखरे, विद्युत साहित्य, गणेशपुजेसाठी लागणारे साहित्य, फटाके, नैवेद्यासाठी लागणारे विविध पदार्थ, रंगसामान, तोरणे आदींनी बाजारपेठ सजली होती.होमगार्ड, पोलिस तैनातगणेशोत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून देवगड पोलीस स्थानकात पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड देण्यात आले आहेत. शिरगाव, मिठबांव, जामसंडे, देवगड एसटी स्टॅण्ड, बाजारपेठ येथे पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवस रात्र सतत गस्त घालण्याचे काम पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग