शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकण बनले फक्त भरतीचेच केंद्र : परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:37 IST

शिक्षक भरती तसेच विविध खात्यात भरती करताना कोकणातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात नाही. इतर जिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे. कालांतराने हे भरती झालेले उमेदवार आपल्या जिल्ह्यात बदली करून घेत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे कोकणातील अनेक युवक बेरोजगार असून कोकण फक्त भरतीचे केंद्र बनले असल्याची टीका मनसे प्रदेश चिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.

ठळक मुद्दे कोकण बनले फक्त भरतीचेच केंद्र : परशुराम उपरकर यांची टीका जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात नसल्याचीही खंत

सिंधुदुर्ग : शिक्षक भरती तसेच विविध खात्यात भरती करताना कोकणातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात नाही. इतर जिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात आहे. कालांतराने हे भरती झालेले उमेदवार आपल्या जिल्ह्यात बदली करून घेत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे कोकणातील अनेक युवक बेरोजगार असून कोकण फक्त भरतीचे केंद्र बनले असल्याची टीका मनसे प्रदेश चिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, ओरोस येथे डी.एड्. तसेच बी.एड्. झालेल्या उमेदवारांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला मनसेने पाठिंबा दिला असून या उमेदवारांच्या लढ्यात वेळप्रसंगी अंगावर खटले घ्यायची वेळ आली तरी ते मनसे घेईल, असे आश्वासन पक्षाच्यावतीने त्यांना आपण दिले आहे.डी.एड्. तसेच बी.एड्. झालेल्या उमेदवारांच्या उपोषणाची शिक्षणाधिकाऱ्यांनी चेष्टा केली आहे. त्यांनी या उमेदवारांना शिक्षकी पेशा सोडा, जेवण खावण करून उपोषण करा असे सांगितले आहे. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांना भेट नाकारली आहे. या उमेदवारांची नोकरीसाठी असलेली वयोमर्यादा संपत चालली आहे. मात्र, सत्ताधारी तसेच लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील भरतीच्या वेळी ७० टक्के स्थानिक उमेदवारांची भरती करण्यात यावी, असा ठराव घेतला आहे. मात्र, सिंधुदुर्गात तशी स्थिती नाही. शिक्षक भरतीच्या वेळी इतर जिल्ह्यातील उमेदवारांची भरती केली जाते.

मात्र, हे भरती झालेले लोक आंतर जिल्हा भरतीच्या वेळी आपल्या संबधित जिल्ह्यात बदली करून घेतात. अशा ५०० ते ६०० शिक्षकांनी आतापर्यंत आपली बदली आपल्या जिल्ह्यात करून घेतली आहे. त्यामुळे कोकणातील तरूणांवर एकप्रकारे अन्याय होत आहे. कोकणाला राजकीय व्यक्तींनी फक्त भरती केंद्र बनविले आहे.शासनाकडून कोकणावर अन्यायकृषी विभागातील भरतीतही कोकणावर अन्याय झाला आहे. शासकीय विश्रामगृहात काम करणारे चौकीदार, खाणसामा तसेच बांधकाम विभागांतर्गत काम करणारे मैलकुली असे चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती करताना विदर्भ, मराठवाडा येथील लोकांची केली जात आहे. त्यामुळे कोकणातील शासकीय विश्रामगृहात येणाऱ्या पर्यटकांना कोकणी पध्दतीचे रुचकर जेवण मिळत नाही.

या कर्मचाऱ्यांकडून बाहेरून जेवण आणून संबधित व्यक्तींना दिले जाते, त्याचे दर जास्त असतात अशी स्थिती आहे. त्यामुळे या सर्व स्थितीचा विचार केला असता कोकणातील लोक चतुर्थ श्रेणीचे कामही करु शकत नाहीत. असे शासनाने ठरविले आहे का? असा प्रश्न पडतो. शासनाकडून कोकणावर हा अन्याय होत असून त्याबाबत राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आपण पत्र व्यवहार केला असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर konkanकोकण