शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकणी मेवा गावठी आठवडा बाजार पावसाळ्यातही : सतीश सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:28 IST

काही वर्षांपासून हापूस आंबा, पायरी आंबा विक्री वाढत असताना कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा (आडीतील) मिळणे दुरापास्त झाला होता़, तो रायवळ आंबा आडीत पिकवून गावठी बाजारात विकला जाणार आहे़ ४ मे पासून हंगाम संपेपर्यंत कोकणी मेवा यात जांभूळ, करवंदे, फणसाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत़.

ठळक मुद्देकणकवली गावठी आठवडा बाजार पावसाळ्यातही : सतीश सावंत यांची माहितीलोकसहभागातून शेड उभारणार, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

कणकवली : काही वर्षांपासून हापूस आंबा, पायरी आंबा विक्री वाढत असताना कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा (आडीतील) मिळणे दुरापास्त झाला होता़ , तो रायवळ आंबा आडीत पिकवून गावठी बाजारात विकला जाणार आहे़ .४ मे पासून हंगाम संपेपर्यंत जांभूळ, करवंदे, फणस या कोकणी मेवा याचे स्टॉल लावण्यात येणार आहेत़.

आतापर्यंत ११ गावठी आठवडा बाजारांना शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला़. त्यामुळे पावसातही आठवडा बाजार सुरू ठेवण्यासाठी लोकसहभागातून शेडची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली़.कणकवली पंचायत समिती सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. यावेळी पंचायत समितीच्या सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, खारेपाटणचे जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, मंगेश सावंत, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता सुतार आदी उपस्थित होते. 

गावठी आठवडा बाजारातून आतापर्यंत १०० हून अधिक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव शेतमालाला मिळाला आहे़. या गावठी आठवडा बाजाराला नव्याने रायवळ आडीतील आंबा, फणस, करवंदे, जांभूळ यासारखा कोकणी मेवा ४ मे पासून कायमस्वरूपी हंगाम संपेपर्यंत ठेवण्यात येईल़.त्यादृष्टीने शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी कट्टे, सावलीसाठी शेडही लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे़. ज्या-ज्या लोकांकडे जुने वासे किंवा इतर साहित्य असेल तर त्यांनी स्नेहसिंधु पदवीधर संघाशी संपर्क साधावा़ दिलेल्या साहित्याची किंवा रोख रकमेची रितसर पावती स्नेहसिंधू पदवीधर संघ देईल, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले़. गावठी आठवडा बाजारासाठी शेड व कट्टे बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी आवश्यक असणारे जांभा दगड ९००, वासे १० फुटी ९० नग, ८ फुटी वासे २०० नग, लाकडी रिपा ३५०० फूट, सिमेंट ४० पोती, वाळू १ ट्रीप, खडी १ ट्रीप, १० हजार नळे आदी साहित्य लागणार आहे़. ग्रामीण भागातून हे साहित्य आम्ही घेऊन येणार आहोत़ त्यासाठी हेमंत सावंत, पंकज दळी, बी़ आऱ परब, पंचायत समिती, कणकवली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहसिंधुचे संदीप राणे यांनी केले आहे़.गावठी आठवडा बाजार पर्यटन केंद्र व्हावे यादृष्टीने प्रयत्नकणकवली पंचायत समिती, कृषी पदवीधर संघ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येत आहे़. आगामी बदलत्या ऋतुंमध्ये शेतकऱ्यांला आपला माल विकताना अडचण येऊ नये याकरिता लोकसहभागातून शेडची उभारणी करण्यात येणार आहे़. 

ही शेडदेखील पारंपरिक साहित्यातून बनविली जाणार आहे़ ही शेड नळे व लाकडी वासे वापरून करण्यात येणार आहे़. हा गावठी आठवडा बाजार पर्यटन अभ्यास केंद्र व्हावे, या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले़

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाMarketबाजार