शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पतंग महोत्सव यादगार, केरळच्या पतंगांचे आकर्षण : स्थानिक छोट्या मुलांनी लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:06 IST

माझा वेंगुर्लातर्फे वेंगुर्ले नवाबाग-सागरेश्वरच्या विलोभनीय समुद्र् किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी बीच पतंग महोत्सव यादगार ठरला. वन इंडिया काईट टिमच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवात केरळचे भव्य असे विविधरंगी पतंग खास आकर्षण ठरले. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनाही पतंग उडविण्याची संधी मिळाल्याने स्थानिक बच्चेकंपनीबरोबरच अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

ठळक मुद्देवेंगुर्ले पतंग महोत्सव यादगार, केरळच्या पतंगांचे आकर्षण स्थानिक छोट्या मुलांनी लुटला आनंद

सिंधुदुर्ग : माझा वेंगुर्लातर्फे वेंगुर्ले नवाबाग-सागरेश्वरच्या विलोभनीय समुद्र् किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी बीच पतंग महोत्सव यादगार ठरला. वन इंडिया काईट टिमच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवात केरळचे भव्य असे विविधरंगी पतंग खास आकर्षण ठरले. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनाही पतंग उडविण्याची संधी मिळाल्याने स्थानिक बच्चेकंपनीबरोबरच अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.हजारो लोकांच्या उपस्थितीत रात्रीपर्यंत रंगत गेलेल्या या पतंग महोत्सवात किनाऱ्यावर घोड्यावरुन, उंटावरुन सैर करण्याची, समुद्रातील पॅरासिलींग, समुद्र्रात जेस्की राईट्स व नौकानयन करण्याची संधी आणि स्टॉलवरील विविध खाद्यपदार्थांची चव चाखता आल्याने सर्वांनाच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटता आला.नवाबाग किनारा झाला पतंगमयपतंग महोत्सवात वन इंडिया काईट टिमकडून मोठ्या आकाराचे सुमारे २० ते ६० फुटापर्यंतचे वीस पतंग आकाशात उडविण्यात आले. यामध्ये कथ्थकली मुद्र्रा, दुर्गादेवी, गरुड, वटवाघूळ, पुष्पकविमान, ग्लोबल वार्मिंगसारख्या विविध पतंगांचा समावेश होता. विविध रंगांच्या आणि आकारांच्या असंख्य पतंगांनी संपूर्ण परिसर पतंगमय झाला होता.

पर्यटनाचा ध्यास वेंगुर्लेचा विकास या मुख्य उद्देशाने स्थापन झालेल्या माझा वेंगुर्ला ग्रुपने पर्यटनास चालना मिळावी म्हणून बीच पतंग महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवाचा प्रारंभ माझा वेंगुर्लाच्यावतीने सागराला श्रीफळ अर्पण करुन व पतंग आकाशात सोडून करण्यात आला. यावेळी घेतलेल्या रस्सीखेच स्पर्धेत नवाबाग संघ विजयी ठरला. तालुक्यातील कलाकारांनी किनाºयावर रेखाटलेली वाळू शिल्पेही लक्षवेधी ठरली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkiteपतंग