शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सिंधुदुर्ग : खांबाळे आदिष्टीदेवी मंदिर जिर्णोध्दार वर्धापनदिन सोहळयात नृत्यसंगमने जिंकली रसिकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:02 IST

खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याची सांगता स्थानिक कलाकारांच्या नृत्यसंगमने झाली. गणेशवंदना, गवळण, घागरानृत्य, ठाकरनृत्य, लावणी, गोंधळ, दिंडी अशा पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण करुन गावातील ८५ कलाकारांनी रसिकांची मने जिकंली. मंदिराची विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.

ठळक मुद्देखांबाळे आदिष्टीदेवी मंदिर जिर्णोध्दार वर्धापनदिन सोहळयात नृत्यसंगमने जिंकली रसिकांची मने विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी : खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याची सांगता स्थानिक कलाकारांच्या नृत्यसंगमने झाली. गणेशवंदना, गवळण, घागरानृत्य, ठाकरनृत्य, लावणी, गोंधळ, दिंडी अशा पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण करुन गावातील ८५ कलाकारांनी रसिकांची मने जिकंली. मंदिराची विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.श्री देवी आदिष्टी मंदीर जिर्णोध्दाराचा १५ वा वर्धापनदिन १८ व १९ रोजी साजरा झाला. आदिशक्ती कलामंच निर्मित नृत्यसंगम या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली. गावातील ८५ कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात बालके, युवक-युवतींसह महिलांचा समावेश होता. त्यामुळे लोकांमध्ये कुतुहल होते.गणेशवंदनाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली आणि नृत्यांतील मनोरे, गवळण, किलबिल नृत्याने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. प्रेक्षकांनी टाळ्यांनी कार्यक्रमाला दाद दिली. त्यानंतर यल्लमा देवीच्या नृत्यासह एकाहून एक सरस नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. संतोष टक्के यांच्या शैलीदार निवेदनाने नृत्यसंगम कार्यक्रम अधिक उठावदार झाला.महिलांनी सादर केलेले पाळणा नृत्य आणि शिवराज्यभिषेक सोहळयानंतर शिवाजी महाराज की जय घोषणा देत रसिकांनी आसमंत दणाणून सोडला. घागरा नृत्य, मंगळागौर रसिकांना चांगलीच भावली.

मॉ तुझे सलाम या देशभक्तीपर गीतावरील नृत्याने वातावरण बदलून टाकले. महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. गावातील लहान थोर कलाकारांना घेऊन आदिशक्ती कला मंचने निर्माण केलेल्या कार्यक्रमाचे नाट्यदिग्दर्शन प्रताप गायकवाड यांनी केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान समिती अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच लवू साळुंखे, आप्पा पवार, सूर्याजी पवार, संजय लोके, दीपक चव्हाण, प्रवीण गायकवाड, गुरूनाथ गुरव, लवु पवार, आनंद पवार, सुनील पवार, संजय साळुंखे, रामदास पवार, प्रमोद लोके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रकाश सुतार, मारूती परब, प्रमोद गुरव, अशोक निग्रे, जानू पाटील, प्रताप गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.कलामंचमुळे संधी!मंदिर जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आदिशक्ती कला मंचाच्या माध्यमातून गावातील लहान थोर मंडळींना कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह होता.

'नृत्यसंगम' कार्यक्रमातील काही महिलांना निवेदक संतोष टक्केंनी बोलते केले. तेव्हा आम्ही आजवर कुटुंबासाठी जगलो. मात्र, गेला महिनाभर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही स्वत:साठी जगलो. आदिशक्ती कलामंचमुळे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली, अशा उत्स्फूर्त भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक