शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मिठमुंबरी येथे करूया सावित्रीबार्इंचा जागर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:27 IST

धर्माची, जातीची, रूढीची बंधने तोडण्याची ताकद सावित्रीबाई फुले यांच्याकडे असल्याने आज समाजात स्त्री मानाने उभी राहू शकली, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या प्रतिनिधी अ‍ॅड. सुरेखा दळवी यांनी केले.

ठळक मुद्देमिठमुंबरी येथे करूया सावित्रीबार्इंचा जागर कार्यक्रमसावित्रीबार्इंमुळे समाजात स्त्रीला सन्मान  : सुरेखा दळवी

सिंधुदुर्ग : गुरू हा खऱ्या अर्थाने शिष्याला मार्ग दाखवितो. देवापेक्षाही गुरू महत्त्वाचा आहे. सावित्रीबार्इंनी तत्कालीन परिस्थितीशी सामना करीत स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. यामागे त्यांचे गुरू ज्योतिबा फुले यांचे फार मोठे योगदान आहे. कोणत्याही क्षेत्राचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

धर्माची, जातीची, रूढीची बंधने तोडण्याची ताकद सावित्रीबाई फुले यांच्याकडे असल्याने आज समाजात स्त्री मानाने उभी राहू शकली, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या प्रतिनिधी अ‍ॅड. सुरेखा दळवी यांनी केले.देवगड तालुक्यातील मिठमुंबरी ग्रामपंचायत, महिला बचतगट महासंघ तसेच पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करूया सावित्रीबार्इंचा जागर कार्यक्रम तसेच महिला व युवतींना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सोमवारी मिठमुंबरी येथील सागरी किनाऱ्यांवरील सुरुचे बन येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रिमा मुंबरकर उपस्थित होत्या.यावेळी व्यासपीठावर डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या संचालिका साधना वैराळे, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नशाबंदी महामंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, बचतगट महासंघाच्या अध्यक्षा किशोरी खवळे, कुणकेश्वरच्या माजी सरपंच दीपिका मुणगेकर, महिला बालकल्याण विभागाच्या मुख्यसेविका पाताडे, मुंब्रादेवी विकास मंडळ मुंबईचे सचिव गणेश गावकर, ग्रामपंचायत सदस्या दक्षता मुंबरकर, लक्ष्मी तारी, रसिका गावकर, पल्लवी डामरी, ग्रामसेवक राजेश बागवाले आदी उपस्थित होते.महिलांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रमसरपंच रिमा मुंबरकर यांनी गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी आज करूया सावित्रीबार्इंचा जागर हा उपक्रम हाती घेतला असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी असा प्रयत्न सुरू आहे. खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना पर्यटनातून व्यवसायाची संधी निर्माण करण्याचा एक मार्ग दाखविला आहे. अनेक उपक्रम आम्ही महिलांच्या प्रगतीसाठी हाती घेत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsindhudurgसिंधुदुर्ग