शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कालेली वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला, तिघांवर गुन्हा, वृक्षतोड पकडताना घडली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:07 IST

कालेली येथील शासकीय जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी करणाऱ्या तिघांना पकडताना एका संशयित चोरट्याने कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांना कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षकास दुखापत केल्याप्रकरणी कालेली-माणगाव येथील तिघा संशयितांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकालेली वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल वृक्षतोड पकडताना घडली घटना

कुडाळ : कालेली येथील शासकीय जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी करणाऱ्या तिघांना पकडताना एका संशयित चोरट्याने कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांना कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षकास दुखापत केल्याप्रकरणी कालेली-माणगाव येथील तिघा संशयितांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी ते व त्यांचे सहकारी वनमाळी, तेली हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोरे या गावातील शासकीय जंगलमय भागात गस्त घालत होते. यावेळी जंगलात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास आले.

याच दिवशी भंडारे यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने भंडारे यांना कालेली येथील वन सर्व्हे नं. ५२ कक्ष क्र. ११५ (अ) या शासकीय जंगलात झाडांची तोड होत असून याची खात्री करा, असे सांगितले. या माहितीनुसार भंडारे व माणगावचे वनरक्षक गुरूनाथ देवळी या दोघांनीही तत्काळ दुचाकीने कालेली येथील वनक्षेत्र गाठले. त्यांचे सहकारी वनमाळी हेही तेथे आले.जंगलातून वृक्षतोडीचा आवाज येत असल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी भंडारे व देवळी यांनी सापळा रचला व लपून बसले. यावेळी वृक्षतोड करणाऱ्यांपैकी तिघेजण वृक्षाचा एक नग घेऊन खाली उतरत असल्याचे दिसले. भंडारे व देवळी यांनी या तिघांनाही पकडण्यासाठी झडप घातली. मात्र, त्यातील एका व्यक्तीने भंडारे यांच्या अंगावर धावून जात हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या कानाच्या मागे, डाव्या हाताच्या अंगठ्याकडे तळहाताला दुखापत केली व हिसका देऊन पळून गेला. तरीही देवळी आणि भंडारे यांनी अन्य दोघांना पकडून माणगाव वनपरिमंडळ येथे आणले.संशयित ताब्यातया प्रकरणी भंडारे यांनी कुडाळ पोलिसांत तक्रार दिली असून संशयित आरोपी मधुकर परब, महेश घाडी व बाळकृष्ण घाडी (रा. कालेली) यांच्यावर अवैधरित्या वृक्षतोड तसेच वनरक्षकास जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना वनखात्याने ताब्यात घेतले असून अधिक तपास माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे विजय चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग