शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुुर्ग :  करुळ घाटात छोटी दरड कोसळली, दीड तास एकेरी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 14:16 IST

शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा करुळ घाटाला काही अंशी फटका बसला. मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळली. तर एके ठिकाणी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

ठळक मुद्देकरुळ घाटात छोटी दरड कोसळली, दीड तास एकेरी वाहतूक  भुईबावडा घाटात पाण्याचा प्रवाह रस्त्यावर; घाटमार्ग सुरळीत

सिंधुदुुर्ग : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा करुळ घाटाला काही अंशी फटका बसला. मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळली. तर एके ठिकाणी मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

भुईबावडा घाटातील गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत होता. तालुक्यातील नद्यानाल्यांना पूर आला होता. त्यामुळे काही ठिकाणी पुराचे पाणी बागायतींमध्ये घुसले होते. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला.शनिवारी दुपारनंतर तालुक्यात पावसाची रिपरिप वाढली होती. रात्री सव्वा एकच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळपासूनच नदीनाल्यांना पूर आला होता. रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर छोटी दरड कोसळल्याने सुमारे दीड तास एकेरी वाहतूक सुरू होती.

त्याआधी एक भला मोठा दगड रस्त्यावर आला होता. मात्र तो रस्त्याच्या कडेला स्थिरावल्याने त्याचा वाहतुकीला फारसा अडथळा होत नव्हता. सार्वजनिक बांधकामच्या रस्ता कामगारांनी दरडीचे दगड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.भुईबावडा घाटातील गटारे माती व पालापाचोळ्याने बंद झाली आहेत. त्यामुळे तुंबलेल्या गटारांच्या पाण्याचा मोठा प्रवाह दुपारपर्यंत रस्त्यावरुनच वाहत होता. त्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर तयार झालेला दगडमातीचा थर छोट्या वाहनांना त्रासदायक ठरत होता.

बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने तुंबलेल्या गटारांचा गाळ काढून रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह गटारात वळविला. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यानाल्यांच्या प्रवाहांची पातळी वाढलेली आहे.

धुक्यात सावधगिरी आवश्यकतालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडींचा धोका वाढत आहे. त्यातच दोन्ही घाटांत रात्री दाट धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना कसरत करून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे दुहेरी संकटाचा धोका असल्याने रात्रीच्या वेळी धुक्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग