शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  कालावल खाडीत तपासणी मोहीम, मालवण तहसीलदारांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 15:54 IST

कालावल खाडीपात्रातील वाळू उत्खनन पट्ट्यात महसूल प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी धडक तपासणी मोहीम राबविली. तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने होडीतून तोंडवळी वायंगणी किनारपट्टीवरील उत्खनन करणाऱ्या होड्या व वाळू रॅम्पची तपासणी केली असता वाळू उत्खननाच्या चार होड्या बेवारस स्थितीत सापडून आल्या आहेत.

ठळक मुद्देकालावल खाडीत तपासणी मोहीममालवण तहसीलदारांचे पथक चार होड्या सापडल्या बेवारस स्थितीत

मालवण : कालावल खाडीपात्रातील वाळू उत्खनन पट्ट्यात महसूल प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी धडक तपासणी मोहीम राबविली. तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने होडीतून तोंडवळी वायंगणी किनारपट्टीवरील उत्खनन करणाऱ्या होड्या व वाळू रॅम्पची तपासणी केली असता वाळू उत्खननाच्या चार होड्या बेवारस स्थितीत सापडून आल्या आहेत.कालावल खाडीपात्रात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार साईनाथ गोसावी, मंडळ अधिकारी मिलिंद पारकर, तलाठी व्ही. व्ही. कंठाळे या पथकाने गुरुवारी दुपारी तोंडवळी व कालावल येथील वाळू पट्ट्यात तपासणी मोहीम राबविली.

तहसीलदार घारे यांनी स्वत: होडीतून खाडीपात्रात उतरत वाळू उत्खनन सुरू असलेल्या होड्यांंची पाहणी केली. वाळू उपसा सुरू आहे, त्या ठेक्याची मुदत व पास दोन्ही शिल्लक असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व डंपर यांच्या क्षमतेनुसार नियमानुसार वाळू पास देण्यात येत असल्याचेही दिसून आले.

या तपासणी दरम्यान मसुरे व कालावल किनाऱ्यावर एकूण चार होड्या बेवारस स्थितीत सापडून आल्या. यातील एका होडीत वाळू साठा शिल्लक होता. या सर्व होड्यांची तपासणी केली जाणार असून मालकांचा शोध घेतला जात आहे.जर या होड्यांचा वापर अनधिकृत वाळू उत्खननासाठी होत होता हे स्पष्ट झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. तसेच महसूल विभागाकडून यापुढेही सर्वच वाळू पट्ट्यात तपासणी मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार असल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार