शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या, ओरोस भावनगर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 14:32 IST

ओरोस भावनगर येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गिताली किशोर पाडावे (३०, चिंदर, ता. मालवण) या विवाहितेने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील करीत आहे.

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या, ओरोस भावनगर येथील घटना  आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सिंधुदुर्गनगरी : ओरोस भावनगर येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गिताली किशोर पाडावे (३०, चिंदर, ता. मालवण) या विवाहितेने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील करीत आहे.मालवण तालुक्यातील चिंदर येथील किशोर मोहन पाडावे सिंधुदुर्ग पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सिंधुदुर्गनगरी मुख्यालय येथे कार्यरत असून गेली दोन वर्ष आपल्या पत्नीसोबत ओरोस भावनगर येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत.

गीताली पाडावे या त्यांच्या पत्नी असून गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास किशोर यांना आपल्या घरात आवाज आला त्याबरोबर ते उठून आतल्या खोलीत गेले असता आतील खोलीत त्यांची पत्नी गीताली पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली. लागलीच त्यांनी शेजाऱ्याच्या सहाय्याने तिला खाली उतरवत येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्या मृत झाल्या होत्या.याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयाच्यावतीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. मात्र, या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून अधिक तपास पाटील या करत आहेत.

गीताली आणि किशोर यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना आठ वर्षाची एक मुलगी आणि तीन वर्षांचा एक मुलगा आहे. पूर्वाश्रमीच्या गीताली निरवडेकर या सावंतवाडी सालईवाडा येथील आहेत. त्यांचे पती किशोर हे पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत.

सध्या ते वैद्यकीय रजेवर घरीच होते. गुरुवारी रात्री जेवणानंतर ही सर्व मंडळी एकत्रच खोलीत झोपली होती. मात्र, त्यानंतर गीताली यांनी केव्हा जाऊन गळफास लावून घेतला हे समजू शकले नाही. तसेच त्यांनी आत्महत्या का केली याचे कारणही सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग