शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:35 IST

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देहिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : परशुराम उपरकरदोन्ही सत्ताधाऱ्यांनी मच्छिमारांची केली फसवणूक; मत्स्य विभागात ३२ पैकी १८ कर्मचारी रिक्त

सिंधुदुर्ग : काँग्रेस आघाडी आणि आताच्या युती सरकारने मच्छिमारांचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला. मच्छिमारांचे प्रश्न या दोन्ही सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात अपयश आले आहे. मत्स्य विभागात ३२ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे.कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, समुद्र किनारी परराज्यातील मच्छिमार येऊन मासेमारी करतात. ती मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य आयुक्तांकडे एकच गस्ती नौका आहे. परप्रांतीय येऊन माशांची लयलूट करत आहेत. १२ नॉटिकल नौका नसल्याने कारवाई करता येत नाही़.

मच्छिमारांसाठी कॉरीडॉर करण्याची घोषणा सरकारने केली़ परंतु अद्यापही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही़ पारंपरीक मच्छिमारांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत आहे़ कर्जावर घेतलेल्या बोटी व केलेले गुंतवणूकीमुळे मच्छिमार अडचणित आहे़ त्यामुळे बोटी ताब्यात घेऊन मच्छिमारांना कर्जमुक्त करावे आणि मच्छिमारांना सरकारने समाधानाने व्यवयाय मुक्त करावे, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.विमानाने चाकरमानी केव्हा येणार?जुन्या पालकमंत्र्यांनी विमानतळाचे तीन वेळा नारळ फाडले़ या पालकमंत्र्यांनी पुन्हा १२ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे येणार असल्याचे जाहीर केले. परंतु या विमानतळावर चाकरमानी केव्हा येणार? हे पालकमंत्र्यांनी सांगितले नाही़ नारायण राणे यांनी विमानतळाच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. 

पहिला गुन्हा त्या कंपनीवर होणार आहे आणि पालकमंत्र्यांना जर अधिकार नसतील तर त्यावेळी राणे पालकमंत्री असताना सीवर्ल्ड आणि औष्णिक उर्जा प्रकल्पात तडीपारीची भाषा का करत होते ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे प्रश्न सोडविले असे सांगत सत्कार स्विकारले. पण प्रत्यक्षात मच्छिमारांची निराशा झाली आहे.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग