शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सिंधुदुर्ग : कलाकार थांबलेल्या हॉटेलवर छापे कसे ? : नारायण राणेंचा प्रश्न, पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 11:57 IST

गोव्यातील आरोपीला शोधायचे होते, तर ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्याच हॉटेलवर छापे कसे काय टाकले ? या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. दोषी पोलिसांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. एवढीच खुमखुमी असेल, तर सीमारेषेवर जाऊन लढा. कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या नादाला लागू नका, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले.

ठळक मुद्देकलाकार थांबलेल्या हॉटेलवर धाड कशी ? : नारायण राणेंचा प्रश्न पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी : गोव्यातील आरोपीला शोधायचे होते, तर ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्याच हॉटेलवर छापे कसे काय टाकले ? या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. दोषी पोलिसांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. एवढीच खुमखुमी असेल, तर सीमारेषेवर जाऊन लढा. कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या नादाला लागू नका, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले.ते सावंतवाडी येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या सुंदरवाडी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नीलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, गुरू मठकर, राजू बेग, मंदार नार्वेकर, रवींद्र मडगावकर, विशाल परब आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री राणे म्हणाले, मी मंत्री असताना विकासात कधीच मागे नव्हतो. पण आज परिस्थिती बदलली आहे. विमानतळ, सी-वर्ल्ड, दोडामार्ग एमआयडीसी, ओरोस आयटी पार्क आदी प्रकल्प बंद आहेत. मी काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दिल्ली येथे गेलो व तेव्हाचे मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्ग मंजूर करून आणला.

आताच्या सरकारने फक्त निविदा काढण्याचे काम केले आहे. सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विधानसभेत बोलण्यास उभे राहिले तरी बाकीचे सदस्य हसतात. मग अशा माणसाकडून कोणती अपेक्षा करणार, असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला.सिंधुदुर्गमध्ये मोठमोठे कलाकार येतात, पण त्यांना जर पोलीस त्रास देत असतील तर ते योग्य नाही. ते कोणाच्या सांगण्यावरून त्रास देत आहेत ते सर्वांना माहीत आहे. पण पोलिसांना एवढी खुमखुमी दाखवायची असेल तर सीमारेषेवर जावे आणि तेथे लढावे.

गोव्यातून पळालेला आरोपी हा कलाकार राहिलेल्या हॉटेलमध्येच लपला होता का? तेथे सर्व कलाकार आहेत. त्यांची तपासणी केली. यावेळी तुमच्यासोबत महिला पोलीस होत्या का, याची चौकशी झाली पाहिजे आणि याचे पोलीस अधीक्षकांनी लवकरच उत्तर द्यावे.

रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाविरोधात जसे आंदोलन केले, त्यानंतर मालवण मच्छिमार प्रश्नावर आंदोलन केले, तसे आता आम्हांला सावंतवाडीत येऊन पोलिसांविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. स्वाभिमान पक्षाने आता शांत बसू नये. पोलीस जर मुद्दाम त्रास देत असतील, तर त्याच भाषेत उत्तर द्यावे. संजू परब तुम्ही राणेंचा कार्यकर्ता असल्याचे दाखवून द्या. कुणामुळे कार्यक्रम बंद करू नका, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत म्हणाले, जिथे लक्ष्मी नांदते तेथे अवदसाही येणारच, असे सांगत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीप्रमाणे मालवणात भव्य-दिव्य कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन केले. राणे यांच्यामुळे मच्छिमारांचा प्रश्न सुटला आहे. येथील आमदार, खासदार कुठे दिसत नाहीत, अशी टीकाही यावेळी केली.

तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्या हॉटेलवर पोलिसांनी छापे टाकले ? हे योग्य नाही. हा बाहेरून आलेल्या पाहुण्या कलाकारांचा अपमान आहे. भविष्यात मोठे कार्यक्रम घ्यायचे की नाहीत याचा विचार करू, असे सांगत पोलिसांनी केले ते योग्य नाही. याचा जाब विचारला जाईल, असा इशारा यावेळी परब यांनी दिला.

प्रास्ताविक ऋषी देसाई यांनी केले तर आभार केतन आजगावकर यांनी मानले. यावेळी माजी सभापती प्रियंका गावडे, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, नगरसेविका समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, दिलीप भालेकर, किरण सावंत, सत्यवान बांदेकर, संदेश पटेल आदी उपस्थित होते.

संजू परब यांच्या कार्यकौशल्याचे कौतुकमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकौशल्याचे तोंड भरून कौतुक केले. परब यांच्या सर्व सहकाºयांनी एकत्र येऊन हा उत्कृष्ट महोत्सव साजरा केला आहे. असेच काम करा. माझी तुम्हांला साथ असेल, असे सांगत संजू परब यांचा राणे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.विविध मान्यवरांचा सत्कारसुंदरवाडी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगदीश पाटील, डॉ. विष्णू चिपळूणकर, बाबुराव कविटकर, सांगेली येथील टीम बाबल आल्मेडा, डॉ. अमृता स्वार, संजय वरेरकर, दिनेश जाधव, संजू विरनोडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग