शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तायक्वांदो स्पर्धेत कणकवली तालुक्याला जनरल चँपियनशिपचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:36 IST

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने येथील नगरपंचायत सभागृहात जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्दे कणकवली तालुक्याला जनरल चँपियनशिपचा बहुमानतायक्वांदो स्पर्धेत चॅम्पियनशिप

कणकवली : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने येथील नगरपंचायत सभागृहात जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कणकवली तालुक्याने 48 सुवर्ण पदक ,33 रौप्यपदक व 25 कांस्य पदकाची कमाई करून या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखत जनरल चॅम्पियनशिप मिळविली .या स्पर्धेत जिल्हयातील 200 खेळाडू सहभागी झाले होते .यात कुडाळ तालुक्याने 5 सुवर्ण पदक , 5 रौप्यपदक व 7 कांस्य पदक मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर सावंतवाडी तालुक्याने 3 सुवर्ण पदक 5 रौप्यपदक व 5 कांस्य पदकांची कमाई करून तिसरे स्थान मिळविले . या स्पर्धेत बेस्ट फायटर म्हणून मुलांमध्ये साईराज सावंत तर मुलींमध्ये सेजल पाटील यांना गौरवण्यात आले . स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक बेलवलकर , तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी , विनायक सापळे , अमित जोशी , अच्युत वनवे , कणकवली तालुका तायक्वादो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे , कोषाध्यक्ष अड. संदिप राणे , जयश्री कसलकर , नितीन तावडे , संदिप सावंत , सावंतवाडी तालुका सचिव अभिजीत राऊळ , कुडाळ तालुका सचिव ओमकार सावंत , राष्ट्रीय पंच मंदार परब , अक्षय कुलकर्णी , अनुप मोडक , जीविता जाधव , संतोष पवार , अवीराज खांडेकर तसेच प्रशिक्षक संदिप मोडक , साई दळवी , सौरभ आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अच्युत वनवे यांनी केले. तर आभार एकनाथ धनवटे यांनी मानले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग