शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकणात होलिकोत्सव, खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी, पंधरा दिवस धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:25 IST

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला.  होळी रे होळी , पुरणाची पोळी अशा विविध आरोळ्या ठोकत परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारण्यात आली. व तिची विधिवत पूजा करण्यात आली.

ठळक मुद्देकोकणात होलिकोत्सव, पंधरा दिवस धूम खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी

कणकवली : शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात होलिकोत्सवाला प्रारंभ झाला.  होळी रे होळी , पुरणाची पोळी अशा विविध आरोळ्या ठोकत परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारण्यात आली. व तिची विधिवत पूजा करण्यात आली.

कोकणात होलिकोत्सव हा सण महत्त्वपूर्ण समजला जातो. विविध ठिकाणी पाच, सात, पंधरा दिवस या होळी उत्सवाची धूम पहायला मिळते. त्यात खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने गावोगावी मुंबईकर मंडळी दाखल झाली आहेत.तांदळाच्या शेवया आणि नारळाच्या खोबºयाचा रस तसेच पुरणपोळ्या अशा लज्जतदार खाद्य पदार्थांचे बेत आखले जात आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. वाढत्या महागाईचा काहीसा फटका जरी बसत असला तरी काटकसर करून अनेक नागरिक हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.गावातील होळीचे मांड रात्रीच्या वेळी गर्दीमुळे गजबजून जात आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या मंदिरांच्या परिसरात असलेल्या होळीच्या मांडांच्या ठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग