शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:59 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवली येथील क्रशरवर खडी भरण्यास निघालेले ह्यकेसीसी बिल्डकॉनह्णचे १५ डंपर अडवून बुधवारी तिथवली ग्रामस्थांनी परत पाठविले.

ठळक मुद्दे महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार खडी भरण्यासाठी आले होते १५ डंपर; ५ जुलैला खास ग्रामसभेचे आयोजन

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवली येथील क्रशरवर खडी भरण्यास निघालेले केसीसी बिल्डकॉनचे १५ डंपर अडवून बुधवारी तिथवली ग्रामस्थांनी परत पाठविले.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत वाहतूक न करण्याचा इशारा ग्रामस्थांनी बिल्डकॉनच्या डंपर चालकांना दिला. दरम्यान, खारेपाटण तिथवली मार्गावरील अवजड वाहतुकीबाबत निर्णय घेण्यासाठी ५ जुलैला खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराचा तिथवली येथे स्टोन क्रशर आहे. तेथून चौपदरीकरणासाठी खडी वाहतूक केली जाते. या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्गावरील तिथवलीपर्यंत रस्ता तीन ठिकाणी खचला असून रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे तिथवलीतील ग्रामस्थांनी कंपनीचे खडी भरलेले १५ डंपर सोमवारी रोखले होते. त्यामुळे कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बाहेर असून ते आल्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे मान्य केल्याने अडविलेले डंपर ग्रामस्थांनी सोडले होते.तिथवली ग्रामस्थांच्या दणक्यानंतर मंगळवारी दिवसभर वाहतूक बंद होती. बुधवारी सकाळी पुन्हा कासार्डेहून क्रशरवर खडी भरण्यासाठी १५ डंपर जात होते. ही बाब लक्षात येताच तिथवलीच्या ग्रामस्थांनी तत्काळ ते डंपर ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबविले.

जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचा ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत खारेपाटण-गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक न करण्याची तंबी ग्रामस्थांनी डंपर चालकांना दिली. त्यामुळे क्रशरवर निघालेले ते १५ डंपर रिकामेच माघारी परतले. अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण ते तिथवली मार्गाची दुरवस्था झाल्याने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय केल्याशिवाय पुन्हा डंपर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास कंपनी आणि ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाहतुकीसंदर्भात ग्रामसभेत निर्णय : हरयाणकंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण-तिथवली मार्गाची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकी, रिक्षा व अन्य छोट्या वाहनांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या अवजड वाहतुकीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी ५ जुलैला खास ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे, असे तिथवली सरपंच सुरेश हरयाण यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक