शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले बंदरामुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:20 IST

वेंगुर्ले बंदरमुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव मिळाले आहे. याचा पर्यटनाच्या माध्यमातून लाभ करून घेण्यासाठी मुंबई मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर मांडवी खाडी ते बंदरनजीक वॉक वे, पाणबुडी आदी सुविधांसह केरळच्या धर्तीवर खाडीवर झुलता पूल केला जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

ठळक मुद्देवेंगुर्ले बंदरामुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव : दीपक केसरकर वेंगुर्लेत शहर विकाससंबंधी आढावा बैठक

वेंगुर्ले : वेंगुर्ले बंदरमुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव मिळाले आहे. याचा पर्यटनाच्या माध्यमातून लाभ करून घेण्यासाठी मुंबई मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर मांडवी खाडी ते बंदरनजीक वॉक वे, पाणबुडी आदी सुविधांसह केरळच्या धर्तीवर खाडीवर झुलता पूल केला जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.येथील सागर विश्रामगृहावर वेंगुर्ले शहर विकासासंदर्भात संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे उपअभियंता डी. जी. पटेकर, सहाय्यक अभियंता व्ही. व्ही. करंगुटकर, कनिष्ठ अभियंता व्ही. व्ही. एकावडे, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष राजन गिरप आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, वेंगुर्ले मांडवी खाडीलगत ते पोर्ट आॅफिसपर्यंतचा भाग खाडी व समुद्र्राच्या दिशेने कोसळला आहे. या भागात मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वॉक वे तसेच पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी बैठक व्यवस्था केली जाणार आहे. तसेच जेटी ते बंदर अशी पाणबुडी आणली जाईल. त्याकरिता येथील जुन्या बर्फ कारखान्याच्या जागेचा वापर करुन पाणबुडी व्यवस्थापन केले जाईल.

झुलता पुलाच्या जुन्या डिझाईनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मुद्दे निर्माण केल्याने मांडवी खाडीवर केरळच्या धर्तीवर येथील वातावरणास पूरक लोखंडी पूल किंवा जुन्या पुलात फेरबदल केला जाणार आहे. नवाबाग येथे मच्छिमारांच्या घरामध्ये पर्यटन योजतेतून पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली जाईल. नवाबाग येथे मच्छिमारांसाठी टाकाऊ माशांची भुकटी कारखाना तसेच मासे वाळविण्यासाठी अत्याधुनिक पद्धती व बर्फ व्यवस्था केली जाणार आहे, असे ते म्हणाले.तिलारी धरणातून वेंगुर्ले, चिपीसाठी पाणी!तिलारी पाणी योजनेकरिता मागील अर्थसंकल्पात आपण शंभर कोटी मंजूर केले असून, याद्वारे तिलारी धरणातील पाणी पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले शहरासाठी व दुसऱ्या टप्प्यात चिपी विमानतळाला दिले जाईल. याबरोबरच निशाण तलावाचे पाणी व तिलारी पाणी यातून वेंगुर्ले शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग