शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वर्षानुवर्षे कार्यरत शिक्षकांना शासनाकडून संरक्षणाची मागणी : डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:42 IST

शिक्षक भरती रखडल्यामुळे शासनाची मान्यता न मिळालेल्या हजारो शिक्षकांना सरकारने मंजुरी देऊन सेवेत कायम करावे. या शिक्षकांना अभियोग्यता परिक्षेची (टीईटी) सक्ती करू नये, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे कार्यरत शिक्षकांना शासनाकडून संरक्षणाची मागणीआमदार निरंजन डावखरे यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

सिंधुदुर्ग : शिक्षक भरती रखडल्यामुळे शासनाची मान्यता न मिळालेल्या हजारो शिक्षकांना सरकारने मंजुरी देऊन सेवेत कायम करावे. या शिक्षकांना अभियोग्यता परिक्षेची (टीईटी) सक्ती करू नये, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी केली आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया बंद होती. मात्र, अनेक शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या व शैक्षणिक गरज लक्षात घेऊन 2012 पासून अनेक शिक्षकांची नियुक्ती केली. मात्र, भरतीवर बंदी असल्यामुळे शिक्षकांच्या पदांना सरकारकडून मान्यता मिळाली नाही. हजारो शिक्षकांना मान्यता नसल्यामुळे शालार्थ आयडी मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना वेतनापासून वंचित राहावे लागले, याकडे आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले.गेल्या वर्षभरापासून पगार रखडल्यामुळे शासनमान्यता न मिळालेले शिक्षक अस्वस्थ आहेत. ते पाच ते सहा वर्षांपासून विद्यादानाचे कार्य करीत आहेत. या शिक्षकांना न्याय मिळण्याची गरज आहे. एकीकडे पवित्र पोर्टलमध्ये शिक्षकांची नोंदणी सुरू असताना, वर्षानुवर्षे कार्यरत शिक्षकांपुढे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या शिक्षकांना अभियोग्यता परिक्षेला (टीईटी) सामोरे जाण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक अस्वस्थ आहेत. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करुन शिक्षकांना सेवेत कायम करावे. तसेच टीईटीची सक्ती करु नये, अशी मागणीआमदार डावखरे यांनी केली.

बेरोजगारीचे संकट टळणारवर्षानुवर्षे ज्ञानदानाचे काम करीत असतानाच, नोकरी जाण्याच्या शक्यतेने हजारो शिक्षक हवालदील झाले आहेत. राज्य सरकारने या शिक्षकांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास शिक्षकांवरील बेरोजगारीचे संकट टळणार आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्गNiranjan Davkhareनिरंजन डावखरे