शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सिंधुदुर्ग : पन्नास मिटरच्या आत दोन जनआक्रोश, सावंतवाडीतील दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:54 IST

गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात परप्रांतीय रूग्णांकडून फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत ५० मीटरच्या अंतरावर दोन जनआक्रोश आंदोलने झाली. दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, गोवा मेडिकल कॉलेज उभारताना सिंधुदुर्गचा वाटाही त्यात मोलाचा आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये सामावून घ्या. फी आकारणी अशीच सुरू राहिली तर भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा बंद ठेऊन आंदोलनात उतरू, असा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देपन्नास मिटरच्या आत दोन जनआक्रोश सावंतवाडीतील दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद  गोवा-बांबोळी येथील रूग्णशुल्क मागे घेण्याची मागणी

सावंतवाडी : गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात परप्रांतीय रूग्णांकडून फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत ५० मीटरच्या अंतरावर दोन जनआक्रोश आंदोलने झाली. दोन्ही आंदोलनांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, गोवा मेडिकल कॉलेज उभारताना सिंधुदुर्गचा वाटाही त्यात मोलाचा आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये सामावून घ्या. फी आकारणी अशीच सुरू राहिली तर भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा बंद ठेऊन आंदोलनात उतरू, असा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्यांनी दिला आहे.

आंदोलनादरम्यान प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनीही चर्चा केली. तर माजी आमदार राजन तेली यांनी आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे जाहीर केले. दोडामार्ग येथे गोवा-बांबोळी येथील रूग्णालयात फी आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला शनिवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दोडामार्ग येथे जाऊन पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी सावंतवाडीत जनआक्रोश आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. तर सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर व मंगेश तळवणेकर यांनीही यापूर्वीच सोमवारी २६ मार्चला प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असे सांगितले होते. तर साळगावकर यांनी शनिवारी हे जाहीर केले होते. पण रविवारी सायंकाळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी आपण वेगळे आंदोलन करणार असे जाहीर केले होते.त्याप्रमाणे सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी, तर जीवन प्राधिकारण कार्यालयाच्या बाजूला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जनआक्रोश आंदोलन केले. ही दोन्ही आंदोलने अवघ्या ५० मीटरच्या आत होती. नगराध्यक्ष साळगावकर यांनी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू केलेल्या जनआक्रोश आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बार असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तर व्यापारी संघानेही आंदोलनात सहभाग दर्शविला. त्याशिवाय माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, सुरेश भोगटे, साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, साक्षी सावंत, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू, सुदन आरेकर, कॉन्ट्रॅक्टर बी. एन. त्रिमूर्ती, शिवाजी पाटील, रमेश बोंदे्र, पत्रकार सीताराम गावडे, शशी नेवगी, अरूण भिसे, अमित परब, गुंडू जाधव, सचिन इंगळे, रवी जाधव, राजू पनवेलकर, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, अभय पंडित आदींसह तब्बल सातशे नागरिकांनी भेट दिली.पोलिसांकडून कडक बंदोबस्तप्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोन आंदोलने असल्याने पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव, योगेश जाधव, अरूण सावंत यांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी अमोद सरगळे, वासुदेव परब, संजय हुंबे, प्रमोद काळसेकर आदी उपस्थित होते.

मी नेहमीच जनतेसोबत जोडलेला : साळगावकरआम्ही आजचा एक दिवस दोडामार्गवासीयांच्या जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बसत आहोत. पण यापुढेही कायमच जनतेसोबत असणार आहे. नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा जनतेचा उद्रेक आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी यातून धडा घेतला पाहिजे व लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmedicinesऔषधंhospitalहॉस्पिटल