शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सिंधुदुर्ग : ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची चेन लंपास, कणकवलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:17 IST

कणकवली येथील एस एम हायस्कूल शेजारील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात दोन महिला व एका पुरुषाने 30 ग्रॅम वजनाची 1लाख 10 हजार रूपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास घड़ली.

ठळक मुद्दे ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची चेन लंपासकणकवलीतील घटना, 1लाख 10 हजारांचा ऐवज

कणकवली : येथील एस एम हायस्कूल शेजारील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात दोन महिला व एका पुरुषाने 30 ग्रॅम वजनाची 1लाख 10 हजार रूपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास घड़ली.वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत शुक्रवारी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी सोन्याचे दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला व एक पुरुष आले. यातील महिलांचे वय साधारणतः 55 वर्षे तर पुरुषाचे वय 40 वर्षे होते.त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनला सोन्याची चेन दाखवायला सांगितले. ती बघत असताना एका महिलेने 30 ग्रॅम वजनाची चेन हळूच दुसऱ्या महिलेकडे दिली. ती चेन परत सेल्समनकडे दिलीच नाही. त्यानंतर चेन पसंत नसल्याचे सांगत त्या तिन्ही चोरट्यांनी दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी पलायन केले. थोड्या वेळाने ही बाब सेल्समनच्या लक्षात आली. त्यांनी व्यवस्थापक तसेच इतर सहकाऱ्यांना ही घटना सांगितली.त्यानंतर त्या चोरट्यांचा शोध घेण्यात आला . मात्र, ते आढळून आले नाहीत . त्यामुळे या घटनेबाबत शाखा व्यवस्थापक अमित नारायण अपराज यानी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली . पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे. हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना सोपे होणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग